श्रीरणचण्डिका प्रपत्ती (पुरुषांसाठी) [17 Aug • 24 Aug • 31 Aug • 7 Sep]



‘श्रीरणचण्डिका प्रपत्ती’ची पाच अंग व त्याचा विधी ‘रामराज्य - २०२५’ ह्या प्रवचनातून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे.

श्रीरणचण्डिका प्रपत्ती पाच तत्त्व:

  1. श्रीरणचण्डिका महिषासूरमर्दिनी ही परमात्म्याची माता आहे. त्यामुळे हा परमात्मा सदैव तिला शरण असतो. आणि म्हणूनच मला ही तिला शरण जाणे आवश्यक आहे.
  2. ही चण्डिका श्रीमहिषासूरमर्दिनी आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आम्हा श्रद्धावानांचा सदैव प्रतिपाळ करतातच. हा दृढभाव राखणे व वारंवार त्याचे उच्चारण करत राहणे.
  3. श्रीचण्डिकेचा पुत्र ज्याला परमात्मा, महाविष्णू, परमशिव, साई, राम, कृ ष्ण म्हणतात, त्याचे आश्रयत्व पत्करणे. त्यांच्या आश्रयाला राहणे. त्यांचे नित्य स्मरण करणे, त्यांच्या आज्ञेत राहणे, तोच माझा आधार आहे ह्या निष्ठेने जगणे. (श्रद्धावानांसाठी सद्गुरु श्रीअनिरुद्ध हेच आश्रयस्थान).
  4. ‘‘माय चण्डिके, तू मला स्वत: जवळ घे आणि मला परमात्म्याच्या हाती सोपव.’’ अशी चण्डिकेला प्रार्थना क रणे.
  5. श्रीचण्डिकेच्या कृ पेने अधिकाधिक भक्ती संपादन करून प्रपंच व अध्यात्म यशस्वी होण्यासाठी चण्डिकेला शरण जाणे. शरण जाण्याची क्रिया म्हणजे तिला व तिच्या पुत्राला, ‘तु बिन कौन सहारा, तूच एकमेव आधार’, अनन्यभाव, पूर्ण प्रामाणिकपणा ह्या निष्ठेने शरणागत असणे.

वरील पाच तत्त्वे मनात धारण करून श्रीरणचण्डिका प्रपत्ती केली जाते.

श्रीरणचण्डिका प्रपत्ती कशी केली जाते ?
श्रावणी सोमवारी पूजेचा मान असतो शिवशंकराचा व नृसिंहाचा. हे श्रावण सोमवारचे पूजन आहे. नृसिंहाचा नृसिंह अवतार म्हणजे अर्धा सिंह व अर्धा पुरुष.

श्रद्धावानाची नृसिंहाबाबत हीच श्रद्धा असली पाहिजे की , जो त्रिविक्रम आहे तोच नृसिंह आहे व नृसिंह आहे तोच त्रिविक्रम आहे. सूर्यास्तानंतर पुरुषांनी घरात वेगवेगळे बसून श्रीरणचण्डिका प्रपत्ती करायची आहे. त्याचा उपासनाविधी खालीलप्रमाणे आहे.

  1. पुरुषांनी सूर्यास्तानंतरच स्नान करून श्रीत्रिविक्रमाच्या प्रतिमेसमोर बसून प्रथम श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र ९ वेळा म्हणावा.
  2. त्यानंतर ‘ॐ नमश्चण्डिकायै’ देवीसिंहाच्या गर्जनेतून उत्पन्न झालेला हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. कारण नरसिंहाचंच मूळ रूप असणारा त्रिविक्रम, तो परमात्मा देवीसिंह बनतो आणि त्याच्या गर्जनेतून हा मंत्र उत्पन्न झाला आहे. कशासाठी? तर पराक्रमासाठी. म्हणून पराक्रम देणारा हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे.
  3. त्यानंतर त्रिविक्रमाची प्रतिमा आपल्या डोक्यावर ठेवून परत नऊ वेळा श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र म्हणावा म्हणजे त्या त्रिविक्रमाचा नृसिंहपणा नरसिंहपणा म्हणजे पुरुषसिंहपणा मस्तकातून आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होतो. पुरुषामधला भित्रेपणा व दुबळेपणा नाहीसा करण्यासाठी याच्या सारखं औषध नाही. त्या नृसिंहाचं तेज पुरुषांच्या संपूर्ण शरीरामध्ये शिरतं आणि तो पुरुष घराचं, धर्माचं आणि देशाचं रक्षण करायला सिद्ध सैनिक बनतो.
  4. त्यानंतर, श्रीत्रिविक्रमाला दहिसाखरेचा नैवेद्य एका वाटीत व केळ्याचा नैवेद्य दुसर्‍या वाटीत अर्पण करावा. दोन्ही एकत्र करायचे नाहीत.
  5. दहिसाखरेतील एक पळी दहीसाखर प्रपत्ती करणार्‍या पुरुषाने त्रिविक्रमाला बघत आधी प्राशन करावे व केळ्यांचा प्रसाद घरातील सर्व स्त्री-पुरुषांस वाटावा.
  6. नंतर परत त्रिविक्रमासमोर बसून त्याच्याकडे बघत बघत उरलेले दहीसाखर प्रपत्ती क रणार्‍या पुरुषाने पिऊन टाकावे. दही हे ओज वाढविणारे आहे.
  7. नंतर त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करून लोटांगण घालावे.

    सगळ्यात शेवटी फुले आहेत. फुले अर्पण करणे म्हणजे उपकार स्मरणे. थँक्स म्हणणे.

सोळा वर्षावरील कोणीही पुरुष ही ‘श्रीरणचण्डिका प्रपत्ती’ करू शकतो. मात्र हे चार पुरुषांनी एकत्र येऊन करायचं नाही. तर प्रत्येकाने एकेकट्याने करायचं आहे.

ही चण्डिकाप्रपत्ती पुरुषांना कमीत कमी आपल्या कुटुंबाचा रक्षक-बॉडीगार्ड बनवते; यशस्वी सैनिक बनवते. प्रत्येक कुटुंबाचे रक्षण झाले की, देशाचं रक्षण होणारच आहे व धर्माचं रक्षणही होणारच आहे. श्रीरणचण्डिका प्रपत्तीने पुरुषांचा पुरुषार्थ वाढेल, पराक्रम वाढेल व पुरुष बळ वाढेल.



Comments