हसला माझा देव ...


बुलंद आवाज रुंद छाती
लोभस हास्य पीळदार मिशी
बाहूपरी मनगट ताकद हत्तीची
बघता डोळ्यातले मार्दव वीरश्री संचारी...
पूजितो महिषासुरमर्दिनीला
कपाळी लावितो उदीला
शोभते हातात साखळी
हीच त्याची ओळख वेगळी
पाहता ज्यास मनाचा ज्वालामुखी होई शांत
सोडूनि सर्व खंत बसा त्याच्या चरणी निवांत
भक्त होती ज्याच्या चरणांशी कटिबद्ध
त्या देवीसिंहास म्हणती बापू अनिरुद्ध,बापू अनिरुद्ध,बापू अनिरुद्ध....



॥ हरि ॐ ॥
श्री राम 
अंबज्ञ 

Comments