मोठ्या आईचा तृतीय अवतार ‘महासरस्वती’वर केलेली कविता (मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथावर आधारित)


महासरस्वती...

महिषासूर वधानंतर जन्मले शुंभ-निशुंभ,
भोगवादी, क्रुर, हिंस्त्र वृत्तीने समृद्ध,
जगासमोर समर्थ राजे होऊन मिरवित,
पडद्यामागे  तयांचे वागणे संपुर्ण विरुद्ध...१

मूळ प्रवृत्तीनुसार हाहाकार उडविला,
सुरगण जल्लोशात पाहून स्वर्ग मिळविला,
अंतिमक्षणी देवांना चूक कळली,
त्यांनी मातेचा आवाहन मंत्र आरंभिला..२

प्रसन्न झाली माय पुत्रांना पाहून,
"महासरस्वती" हे सुंदर नाम घेऊन,
सौम्य शांत स्वरुप असले जरी,
आली क्रुर असूरसंहारासाठी धावून...३

चण्ड-मुण्ड शुंभ-निशुंभाचे सेनापती,
अवाक् झाले मातेची पाहून दीप्ती,
शुंभ-निशुंभ ह्यांच्या आज्ञेवरुन,
आले तिला नेण्यास हिमालयावरती...४

सुग्रीव, धुम्रलोचनाचे काहीच न चाले,
मातेच्या एका हुंकाराने भस्म झाले,
कालीने मातेच्या मिळालेल्या आज्ञेने,
मातेस छळणारे चण्ड-मुण्ड वधिले...५

रक्तबीज भाच्यांच्या मदतीस अवतरला,
देवीशक्तीने सतत त्यावर आघात केला,
अंती मग मातेच्या आज्ञेनुसार कालीमुखात,
कराल दाढेखाली नव्याने न तो जन्मला...६

मग शुंभ-निशुंभ युद्धात उतरले,
मायावी प्रकार मातेवर करण्या धावले,
मातेच्या हृदयावर गदा घेऊन धावणा-या,
चण्डिकेने निशुंभाला त्रिशुलाने वधिले...७

शुंभ- मातेचे युद्ध अंतरिक्षात चालले,
त्यासही क्षणार्धात तिने गरगरा फिरविले,
समुळ नाश करुन केला त्याचा संहार,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८

Poem By : Pranilsinh Takale,     Design By : Truptiveera Sonde
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)

Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale

Comments