मोठ्या आईचा चतुर्थ अवतार ‘रक्तदन्तिका’वर केलेली कविता (मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथावर आधारित)


रक्तदन्तिका...

शुंभ-निशुंभ असूर वधानंतर,
बहु दुःखित झाली दिती,
दनुला कपटाने सवत बनवण्या,
घेतली तिने शुक्राचार्यांची संमती...१

शुक्राचार्यांनी मग रचला कट,
कश्यप दनुस नाही स्वीकारणार निश्चित,
परि करुन त्यांनी निश्चय घट्ट,
निद्रेत घडवून आणविला प्रज्ञापराध...२

दानव दनुस झाले कश्यपाकरवी,
वृत्ती आसूरी त्यांची दानवी,
अघटित अशुभ मार्गाची वाटचाल,
प्रयास बनण्या क्रुर महामानवी...३

मग अदितीमतीच्या देव पुत्रांनी,
'नवमंत्रमाला' पठण त्यांनी आरंभिले,
अहोरात्र त्या पिता-पुत्रांनी सतत,
आदिमातेस त्यांनी मनापासून प्रार्थिले...४

पुत्रांच्या स्तोत्रपठणाने झाली प्रसन्न,
केले तिने अतिभयानक रुप धारण,
रक्तांगवर्णा ती अंतरिक्षाच्याही वर,
सत्वर धावून आली करण्या पापनाशन..५

चर्तुभुजा तू वाहत्या रक्ताची,
जिव्हा, नखे बुब्बुळेही रक्तवर्णाची,
खडग, मुसळ,  लांगल, रक्तपात्र,
ही नावे तुझ्या चर्तुशस्त्रांची...६

रक्तचामुण्डा गौरवी ऋषीजन तुजला,
योगबळे जगातून खेचसी दानवाला,
कराल दाढेखाली नाश करुन त्यांचा,
निर्विघ्न करसी तू सर्व पृथ्वीला...७

असू दे माते आम्हांवर तुझी नजर,
शत्रूपासून रक्षिसी तू आम्हां साचार,
अशुभनाशासाठी झाली तू रक्तदन्तिका,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८

Poem By : Pranilsinh Takale,     Design By : Truptiveera Sonde
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)

Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale

Comments