वैशाख पौर्णिमा पूजन वैशाख पौर्णिमाच्या दिवशी सत्य,प्रेम, व आनंद ह्या पवित्र त्रीसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व ) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात आणि त्यावेळी ते सत्वृत्तीच्या उत्थपनाची योजना आखतात. या दिवशी सदगुरू आपल्या लाभेवीन प्रेमाची जास्तीत जास्त उधळण करतात आणि सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात. या दिवशी आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.
वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.
- वैशाख पौर्णिमा हि बुद्धपुर्णिमा आहे.
- वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.
- वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चौवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते कारण भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.
वैशाख पौर्णिमा उपासना :-
- प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे, नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.
- श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.
- दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे.
(सदगुरू तारक मंत्र – ॐ मनः सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नम:) - त्यानंतर
१. श्री अनिरुद्द कवच
२. श्री हनुमान चालीसा
३. श्री हनुमान स्तोत्र
४. श्रीसाईनाथांची वचने
५. श्री अनिरुद्धांची वचने
६. श्री आदिमाता शुभंकर स्तवन व श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवन
या पैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे. - त्यानंतर
१. आंब्याचे पन्ह
२. कच्चा आंबा व भिजलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद अर्पण करावा.
त्यानंतर लोटांगण घालावे.
हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणारया षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत. म्हणून त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम,क्रोध,मोह,मद,मस्तर, लोभ या षडरीपुंपासून दूर राहण्यासाठी हि साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.
जो कोणी प्रेमाने वैशाख पौर्णिमेला हि उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला श्री सदगुरू श्री हनुमंता बरोबर येवून जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धानी दिली आहे.
|| मी अम्बज्ञ आहे ||
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback