‘मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌’


‘मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌’मौन : कायीक, वाचिक, मानसिक. मौनं : त्रिविक्रम सतत जवळ असतो. शरीराने, वाचेने मौन धरायचं. शरीराने हालचाल करायची नाही, तोंडाने बोलायचं नाही, मनाने विचार करायचा नाही. फक्त त्या त्रिविक्रमाला हाक मारायची, “हे त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’’ अतिशय शांत चित्ताने डोळे बंद करून हे बोलायचा प्रयत्त्न करा. डोळे बंद करा, अंगाची हालचाल करू नका. शरीराची, तोंडाची हालचाल करू नका. मानसिक हालचाल करू नका. मनात विचार येऊ नयेत म्हणून प्रयत्न करू नका. मनात फक्त हाच विचार करा की, ‘त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.’ हे मनातल्या मनात बोलत राहायचं. ओठांची हालचाल अजिबात करायची नाही. मनात एखादा विचार येत असेल तर त्याला घालवायचा प्रयत्न करु नका आणि त्याला वाढवायचाही नाही. मग बघा, हे वाक्य तुमच्या मनाला कसं shape देतं! हे वाक्य तुमच्या मनाला शेप देणारं आहे. हे invitation आहे. जेवढा जास्त वेळ कराल तो तेवढा अधिकाअधिक प्रखर होणार.

दररोज सकाळी पाच मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट करा. सकाळी नाही जमलं तरी रात्री नक्की करा. ह्या पाच मिनिटांत तुमचं आख्खं आयुष्य बदलू शकतं. दररोज पाच मिनिटं तुमच्या मनातले विचार आणि त्रिविक्रमाचा तुमच्यासाठीचा प्लॅन आणि तुमची आत्ताची परिस्थिती यातली तफावत ह्यामध्ये जो विचार आवश्यक आहे तो विचार त्रिविक्रम वाढवेल आणि जो अहितकारक आहे तो विचार दूर करेल. Enjoy that peace.
―प.पू.अनिरुध्द बापू

Comments