Poem : त्याच्या मर्जीत ... (by Jitendrasinh Sankhpal)



धो धो पाऊस आला, नाही त्यास विश्राम
पाऊस ही रडला , विना हरी , कोरडे हरिगुरुग्राम

पाऊस ही रडुनी परतला , धाडिले भास्करा,
तरीही नाही आला , तेजोमय भास्करा

लेकरे होती थोडी नाराज ,
आतुर ऐकण्यास बाप्पाचा आवाज

बाप्पा आहे हो व्यस्त लेकरांच्या काळजीत
नको नाराजी , आनंद आहे त्याच्या मर्जीत

- जितेंद्रसिंह शंखपाळ , पुणे

Comments