झाला बाई देव वर्षांचा साठ


तुझ्या येण्यासाठी देवा
सृष्टीनेही पाहिली वाट
बघता बघता तिलाही कळेना
कशी सरली वर्षे साठ

भक्तीच्या गंगेत भरलास
रिकामी आमुचा श्रद्धेचा माठ
कधीच थकत नाहीस का देवा?
धावतोस भक्तांसाठी गेली वर्षे साठ

अनादी तू अनंत तू
जन्मोजन्मी देवा विश्वासाची तू बांधलीस गाठ
घट्ट धरुनी हात चालीशी
अनेक जन्मे तरीही दिसती साठ

आभाळाच्या आभाळाची माया तुझी
अफाट अथांग प्रेमसागर तू
भक्तांसाठी तरीही एक शीतल शांत लाट
डोळे भरुनी पाहूदे अनिरुद्धा तुजला आज
झाला बाई देव वर्षांचा साठ

तान्हुला मोठ्या आईचा असशी
चालविशी विश्वाचे रहाट
हाचि देव लाभू दे मोठी आई मजला
अनेक जन्मे सहस्त्र साठ

अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे

Comments