Poem : पुत्र आदिमातेचा


पुत्र आदिमातेचा
दास ज्याचा हनुमंत
दया क्षमेचा पुतळा
हा अनादि अनंत
आज्ञा चक्राचा
असे  तो स्वामी
मन प्राण ज्याचे
सदा रामनामी
अशा ह्या हनुमंताची
भक्ती तू आम्हा दिलीस
कुतर्कांचा करुनी नाश
शुद्ध भक्ती तू करुन घेतलीस
पंचमुखहनुमत्कवच देऊनी
दिलीस आम्हा अप्रतिम भेट
पापांचा आमच्या करुनी नाश
गोकुळात घेतलेस आम्हाला थेट
श्रीशब्द असणारा तू
आलास माझ्या जीवनी
आनंदे भरलेस आयुष्यास
जडली तव नामाची मोहिनी
मागायला तर काही उरलंच नाही
दिलंस एवढं तू भरभरुन
सोडू नकोस कधीच मजला
ठेव चरणी तव घट्ट धरुन

Poem by:
- किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
बदलापूर(पूर्व)

Comments