Skill Bank Challenge- 02 - Jagadambe ay Durge

Challenge from- Ganeshsinh Gondkar

Challenge to - Gauravsinh Shimpi

Challenge - अश्विन नवरात्रातील मोठ्या आईचे आगमन

Ya vishayavar ovi lihun tya var mothya aaicha ani  bappacha pic asel asa artwork

Ovya shakyato calligraphy karta aalya tr karavyat. Calligraphy compulsion nahi..


हरी ओम,
अश्विन नवरात्रीचा तो पहिला दिवस होता, सगळीकडे आईच्या आगमनाचा जल्लोश सुरु होता, आणि नेमक्या त्याच दिवशी “अनिरुध्द कलादालनSkill Bank Challenge मध्ये मला “अश्विन नवरात्रीतील आईचे आगमन” या विषयावर ओवी लिहुन एक छोटस आर्ट्वर्क करण्याचे Challenge मिळाले. खरं तर हा अनुभव मला यासाठीही अधिक जवळचा आहे, कारण घरात आईच्या इष्टिकेसमोर बसुन ४-८ ओळी  लिहिण्याची संधी आईने मला स्वत: उप्लब्ध करुन दिली.

आईला स्मरण करताच तिची वेगवेगळी रुपे प्रत्येक श्रद्धावानाच्या डोळ्यासमोर येतात, तशीच माझ्याही आली. तिच्या कोणत्याही रुपात तिचं तिच्या लेकरांवरच प्रेम हे सारखच असत, मग ती जगदंबा असो की दुर्गा, चंडीका असो वा अंबाबाई आणि अजुन बरीच.

“आई” या शब्दात प्रेमच ईतकं भरुन आहे की हि ओवी सुचायला फक्त माझ्या मनातला भाव पुरेसा झाला, ओवी लिहिता लिहिता ती चाल देखील तोंडी आपोआप बसली, आणि Artwork सुद्धा सहजच तयार झालं. Artwork करताना देखील मी त्या ओवीच्या चालीत रमलो होतो. आई जगदंबेची माया, करुणा ईतकी जबरदस्त आहे कि हे सगळं तिने स्वत:च करवुन घेतलं.

धन्य धन्य आई तुझी लिला अगाध ।
आई चंडीके तुला माझा कोटी कोटी प्रणाम ॥

गौरवसिंह शिंपी, पुणे.
हरी ओम । श्री राम । अंबज्ञ । नाथसंविध

Comments