Skill Bank Challenge 07 - Bhaktibhav Chaitanya Poem

Challenge By Anjaysinh Gorad

Challenge to Bhairaviveera Joshi

Challenge 
भक्तिभाव चैतन्य काय आहे व भक्त ते कसे अनुभवतो अशा आशयाची छोटीशी कविता व त्यावर आधारित आर्टवर्क. आर्टवर्क मोबाईल किंवा फोटोशॉप मध्ये असले तरी चालेल.




अनुभव:
खूप दिवसांत काहीही आर्टवर्क बनवले नव्हते, अशावेळी असे Challenge मिळाल्यामुळे एकदम उत्साह आला.  खूप गोष्टी मनात होत्या अस करु की तसं, भक्तिभाव चैतन्‍य कसे दाखवावे, अनेक विचार होते पण सगळं कसं दाखवावं आणि लिहावं असं असतांना मनात मात्र एक पक्क होतं डॅडचा हात घटट धरुन रहाणे ही कल्पना  आणि अर्थात त्रिविक्रम Image,  भक्तिभाव चैतन्‍याच्या चिमण्या. डॅडचा हात धरुन जाणारी मुलगी हा फोटो शोधला, त्रिविक्रमाचे अनेक रुपे कुठली घ्यावी काय काय घ्यावे. करत खूप गर्दी नको म्हणून सिंपल करण्याचा प्रयास केला आहे. कविता शेवटपर्यंत तयार नव्हती, मग पेपरवर खूप काही लिहून काढले, त्यातले काय काय घ्यायचे ते ठरवून मग शेवटी कविता प्रत्यक्षात उतरली आणि बापूंनी असे आर्टवर्क करवून घेतल्यावर अतिशय आनंद देऊन गेला…. हाच तो भक्तिभाव चैतन्य… जो अनिरुध्द कलादालनच्या  माध्यमातून मिळत आहे. खूप खूप खूप अंबज्ञ…. … नाथसंविध डॅड…

अंबज्ञ बापूराया……….
मी अंबज्ञ आहे…
भैरवीवीरा जोशी

Comments