श्रद्धावानांसाठी एक आगळेवेगळे चॅलेंज - R U READYYY? :)


हरि ॐ 
सर्व स्तरातून अनिरुद्ध कलादालनला मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता, आता फक्त सभासदांसाठीच नाही तर बापूंच्या प्रत्येक लाडक्या श्रद्धावान मित्रासाठी एक आगळेवेगळे चॅलेंज आम्ही घेऊन येत आहोत. (Open to all shraddhavans)

 मग काय तयार आहात ना????* 

बर मग काय असणार आहे  चॅलेंज.... उत्सुकता वाढलीय ना! 😊

➡ खाली एक ऑडिओ फाईल ची लिंक उपलब्ध करून देत आहोत ती डाऊनलोड करुन त्या ऑडिओ ला साजेसा एक झक्कास व्हिडीओ बनवायचा आहे...ऑडियो  तुम्हीच डाउनलोड करून ऐका.

➡ हा व्हिडिओ तुम्हाला जसा जमेल तसा .. कोणतेही सॉफ्टवेअर वापरुन ... कोणतेही मोबाईल ॲप वापरुन ... कोणतेही सोशल मिडियावर उपलब्ध असलेले बापूंचे फोटो / व्हिडिओ वापरुन तुमच्या स्कील नुसार बनवायचा आहे.

➡ हा व्हिडीओ बनविल्यानंतर

  1.  तो तुमच्या सोशल मीडियावर पोस्ट करून  #AniruddhaBhaktibhavChaitanya, #aniruddhakaladalan,  #AKSkillChallenge हे हॅश टॅग टाकायचे आहेत. 
  2. तसेच अनिरुद्ध कलादालन चे फेसबुक पेज ला टॅग ही करायचे आहे. 
  3. अनिरुद्ध कलादालनच्या फेसबुक मेसेंजर मध्ये आपल्या पोस्ट ची लिंक दिली तरी चालेल. 

➡ तुम्ही केलेले व्हिडीओ तुमच्या नावासाहित अनिरुद्ध कलादालनच्या मार्फत रिशेअर केले जातील आणि बेस्ट व्हिडीओज ना आमच्याकडून एक appreciation greeting दिले जाईल आणि ते व्हिडिओ अनिरुद्ध कलादालन ब्लॉगमध्ये सुद्धा  फिचर होतील. आणि बरंच काही*.


कला तुमची ... दाद आमची  ...  वाट पाहत आहोत .. 😊

हरि ॐ ... श्रीराम ... अंबज्ञ
नाथसंविध

Comments