Skill Bank Challenge 09 - Sketch of DAD

 Skill Bank Challenge

Challenge from- Yogeshsinh Parulekar

Challenge to - Titikshaveera Redkar

Challenge :  तितिक्षाला डॅडचे एक sketch/drawing काढायचे आहे.









अनुभव:-
हरी ओम,
कलादालन टीम मध्ये आताच थोड्या दिवसांपूर्वी येणं झालं निमित्त अस झालं की गणपती कार्यशाळा सेवा
आणि प्रवास सुरु झाला बापू हाताला धरून पुढे घेऊन गेला कळलं सुद्धा नाही आणि कलादालन म्हणजे नकी
काय ते समजून घेतलं ज्याचं म्हणून बापूवर प्रेम आहे आणि फक्त त्याच्यासाठी काही करण्याची इच्छा आहे ते
सगळं ईथे करता येत
त्यातूनच कलादालन ची संकल्पना स्किल बँक चॅलेंज अचानक एक दिवस ध्यानी मनी नसताना ते चॅलेंज
मला दिले गेले. चॅलेंज असा होतं की पूज्य बापूंचा फोटोचे चित्र काढायचे होते आता अस झालं गणपती
कार्यशाळेत आखणी करून घेतली गणपती बाप्पाची बापुनीच मग त्यालाच हाक मारली बघा बाबा मी
पेन्सिल धरते हातात फक्त बाकी तुम्ही हाथ धरा कारण तो चित्रकार थोर हे आपण अभंगातून ऐकतो मग
त्याने एकदा हाथ धरला की झालं ना अशक्य ते शक्य होणारच जेव्हा चित्र पूर्ण झालं माझा विश्वास बसत
नव्हता हे मी करू शकले मग कळलं त्याने नाथसविंध् घडवलं आणि चित्र पूर्ण झालं
खरच कलादालन या वेगवेगळ्या विषय संकल्पना घेऊन येत यातून खूप काही शिकण्यासारखे आहे जेवढं
म्हणून शिकता येईल तेवढं बापूसाठी कार्य करायला गती मिळेल
शेवटी प्रयत्न करणे माझे काम यशदाता तो मंगलधाम
असा सुंदर अनुभव होता है चॅलेंज करतानाचा.
तितिक्षावीरा रेडकर.
हरी ओम । श्री राम । अंबज्ञ । नाथसंविध

Comments

  1. Khup Chan sundar Ambadnya Nathsanvidh

    ReplyDelete
  2. प्रयत्न करणं, माझं काम।
    यशदाता तो मंगलधाम॥
    याच दोन जादुई ओळींच्या अनुभवातुन सध्या आमचा प्रवास सुरू झाला आहे!

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback