Skill bank challenge 20 - Sketch of Shree Harigurugram's stage during Dusshera

Skill bank challenge

Challenge from -Arundhativeera Das

Challenge to Mrunalsinh Mahadik

Challenge :
Mrunalsinh has to imagine the stage of Shree Harigurugram on the occasion of Dussehra and draw a sketch of the same. Abstract sketch! 





हरि ओम

हे जे स्किल बँक चॅलेंज होते त्यात समोरच्या व्यक्तीने दिलीले चॅलेंज आपण पूर्ण करायचे असते तेही याच ज्यांनी चॅलेंज दिलंय त्याचं समाधान होई पर्यंत.

हे चॅलेंज मला अरुंधती वीरा ने दिलं होतं.स्किल चॅलेंज स्वीकारले खरं पण आता कसं करायचं हेचं प्रश्न होता , पण जेव्हा सर्व प्रश्न पडतात तेव्हा एकच मनातून उत्तरं येतं ते म्हणजे "अनिरुध्द". मग काय त्यालाच साद घातली. खरंतर कधी दसरायची उपासना अटेंड नाही केली , केली होती परंतु लहानपणी . त्यामुळे दसऱ्याला श्रीहरिगुरूग्रामला स्टेज कसं असतं हे ठाऊकच नव्हतं पण लहानपणीचं अंधुकसा आठवतं होतं . बाबाला म्हणालो बघ बाबा तूच मला जेवढं आठवतंय तेवढं मी नक्कीच स्केच काढेन. हा स्केच काढताना मनात आलं ते मोठी आई , तिची सर्व अस्त्रे , दत्तबाप्पा आणि दसरा म्हंटल्यावर सर्व अस्त्र - शस्त्रांचे पूजन म्हणून आपलं बल मध्ये आपण कुठले अस्त्र वापरतो तर मुग्दल हे मी विचार करता करता इमॅजिन केलं आणि करता करता हे स्केच पूर्ण झाले . आपण फक्त एक पाऊल पुढे टाकले की तो आपोआप आपले ९९ पाऊले टाकतो आणि आपलं कुठलीही गोष्ट अगदी सहज ती उत्तमरीत्या तोच पूर्ण करून घेतो , अगदी १०८% . 
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा!"

मला हे स्किल बँक चॅलेंज पूर्ण करायला पाच तासचा अवधी लागला. हे चॅलेंज करताना खूप काही नवीन शिकायला मिळाले. हे चॅलेंज करताना मला खूप मज्जा आली , आणि जेव्हा चॅलेंजर पूर्ण झाले तेव्हा मला खूपच आनंद झाला. मी तर काहीच नाही केलं सर्व करणारा फक्त तो एकच "अनिरुध्द!". 

- श्रद्धावान मृणालसिंह महाडीक

।। हरि ओम ।। 
।। श्रीराम ।। 
।। अंबज्ञ ।। 
।। नाथसंविध ।।
।। जय जगदंब जय दुर्गे ।।

Comments