सच्चिदानंदोत्सव वर कविता




सच्चिदानंदोत्सव

श्रद्धावान वाट पहाती वर्षभरी ,

आली जवळ ती आनंद पर्वणी .


सच्चिदानंदोत्सव साजरा करीती ,बापू भक्त अंबज्ञतेने घरोघरी .


बापूंना सुस्वागतम् करण्याची ,श्रद्धावानांची उडाली एक घाई .


बापू आगमनाच्या कल्पनेनेप्रत्येक श्रद्धावान हरखून जाई


गुढ्या तोरणे लेऊन नटले घरदार ,मनमोहक रांगोळ्यानी रंगले प्रवेशद्वार .


सुबक,सुंदर पणत्यांनी सजले अंगण ,आकाशकंदीलांनी फुलले तारांगण.


घराघरातून होऊ लागला नैवेद्य गोडधोड .पाककौशल्यातुन दिसते वीरांची चढाओढ .


पंचपक्वान आणि सुमधुर अभंगांसहीत ,सुरू झाली बापूंसमवेत अंगत - पंगत .


बापूं बरोबर जेवणाची अनोखीच रंगतपरमानंद होतो लाभता , बापूंची संगत.


बापू , प्रत्येकाचया मनात आहे एक आस .जीवनात दररोज लाभावा तुझा सहवास.


तुझ्या नामस्मरणासह आमचा येणारा ,प्रत्येक क्षण न क्षण आहे आनंदोत्सव.


तुझी कृपादृष्टी लाभली हा आहे.आम्हा बाळांचा नित्य सच्चिदानंदोत्सव .


।। श्रीअनिरूद्धापणमस्तु।।


सौ. ज्योतीवीरा नेमुरी .राजगुरूनगर .
अंबज्ञ .नाथसंविध् नाथसंविध् नाथसंविध् 


Comments