Skill bank challenge
Challenge from - Reshmaveera Narkhede
Challenge to - Pranilsinh Takale
Challenge-
प्रणिल ने भक्तिभाव चैतन्यावर एक छोटी गझल लिहुन ती स्वतःच्या आवाजात चालबद्ध करावी.
त्यात बापूचें प्रेम, क्षमा, सौंदर्य, करुणा आले पाहिजे.
गझल लिहण्यासाठी संतोषसिह राणे कडून मार्गदर्शन घेऊ शकतो.
Experience
आधी चॅलेंज काय असतात हे पाहिलं होतं ब्लॉग वर. पण मला कधी असं काही चॅलेंज मिळेल असं नव्हतं वाटलं. रेश्मावीराने काहीही पूर्व कल्पना न देता डायरेक्ट ग्रुप मध्ये चॅलेंज दिलं. मी सहज वाचलं की त्यात गजल आहे. परत एकदा वाचलं आणि थोडं दडपण आलं कारण त्यात लिहिलं होतं एक एक गजल लिहून तिला चाल बद्ध करायचे आहे.
म्हटलं आधी कधीच गजल लिहिली नाही, ऐकली आहे पण त्यात कधी जास्त रस घेतला नाही. कविता वगैरे करून त्या येऊ शकतात असं माहीत होतं. पण गजल??? शेवटी डॅडच नाव घेतलं आणि सुरुवात केली. आधी गजल काय असते, कशी बनवतात, कशी गातात असा थोडा अभ्यास केला. आणि मग माझ्याच काही अनुभवावरून गजल नाही पण कविता म्हणून लिहायला सुरुवात केली आणि जवळजवळ 5-6 वेळ लिहून शेवटी रात्री एक गजल फायनल केली.
आता वेळ होती तिला चालबद्ध करण्याची. असंच गुणगुणत काहीशी चाल लावायचा प्रयास केला. "गुंज उठी पिपासा" ह्या अलबम मध्ये ही गजल ह्या काव्य प्रकाराला प्राधान्य दिले आहे हे माहीत होतं. पण तो अलबम मी आधी डाऊनलोड केला नव्हता. कारण मग आपण त्यातलं काही ऐकून घेऊन पुढे गेलो तर तीच चाल सतत डोक्यात येऊन आपलं काम होणार नाही, हे ठरवलं. रात्री पर्यन्त सगळी चाल ठरवून सकाळी शांत पण रेकॉर्ड करून ते चॅलेंज डॅड चरणी अर्पण केलं.
चॅलेंज घेतलं की ते पूर्ण करेपर्यंत झोप शांत लागत नाही हे खरंय. व त्यात डॅड आपल्याला सर्वतोपरी मदत करतोच, ह्याची खात्री आहे.
नाथसंविध्
प्रणिलसिंह टाकळे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback