About Aniruddha Kaladalan


आज अनेक आर्टवर्क फेसबूकवर, व्हॉटस अपवर फिरताना दिसतात. आर्टवर्कच्या एका कोपर्‍यात एक छोटासा लोगो दिसतो आणि मग कळते की हे अनिरुद्ध कलादालनचे आर्टवर्क आहे.

"अनिरुद्ध कलादालन"

२०१४, २४ मार्चला "अनिरुद्ध कलादालन"ला सुरुवात झाली. जणू बापूंचीच इच्छा होती म्हणून सर्व कलाकार श्रद्धावान एका ठीकाणी एकवटले. वाटले ही नव्हते की एखाद्या छोट्याश्या रोपट्याचे इतक्या मोठ्या वृक्षात रुपांतरण होईल. परंतू अनेकांना अजूनही कळत नाही की हे अनिरुद्ध कलादालन काय आहे आणि कसे आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच हा लेखप्रपंच. कारण जस जसे वर्षे पुढे गेले तस तशी आम्हालाही उत्तर सापडत गेली. तर पाहुयात अनिरुद्ध कलादालनचा इत्यंभूत प्रवास....

न्हाऊ तुझिया प्रेमेचा कार्यक्रम झाला आणि बरेच आर्टीस्ट एकत्र आले. ज्यांना फोटोशॉप वगैरे येत होते, जे आर्टवर्क करु शकत होते, असे हे श्रद्धावान होते. पण कार्यक्रम संपला आणि मग सगळे शांत झाले. त्यातच एका सांगलीच्या श्रद्धावानाने डीझायर्न्स आणि फोटॊग्राफीसाठी वॉटस अप ग्रुप केला. या ग्रुपमध्ये सगळे अशी उत्साही मंडळी एकत्र आली. मग सगळ्यांनी ग्रुपवर त्यांनी त्यांनी तयार केलेले आर्टवक टाकू लागले. चर्चा होऊ लागली. हळूहळू ग्रुपला काहीतरी वेगळे नाव द्यावे असा विचार करण्यात आला आणि मग "अनिरुद्ध कलादालन" हे नाव सर्वानुमते मान्य झाले. नाव ठरविल्यावर याचा लोगो करण्याची हौस आम्हा सर्व मंडळींना आली. सर्वजण आपापल्या पद्धतीने विचार करुन सध्याचा जो लोगो आहे तो तयार केला. नंतर सगळ्यांचा उत्साह पाहून "अनिरुद्ध कलादालन’चा ब्लॉग करावा आणि त्यावर विविध विषयांवर आर्टवर्क करावे असा विचार मांडण्यात आला आणि २४ मार्च सुचितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी "अनिरुद्ध कलादालन" ब्लॉग लॉंच करण्यात आला.

पण पुढे काय कसे करायचे काहीच ठरविलेले नव्हते. मग सर्वानुमते अनिरुद्ध कलादालनच्या कक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता केवळ डिझायनर्सच नाही तर कोणीही ज्याच्याकडे कुठलीही कला आहे आणि त्याला त्या कलेतून डॅडचे गुणसंकीर्तन करायचे आहे तो प्रत्येक जण यात सहभागी होऊ लागला.

हा झाला थोडक्यात इतिहास....

अनिरुद्ध कलादालनाची सुरुवात झाली आणि सगळ्यांची मेहनत व प्रेम पाहून पूज्य समीरदादांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन ही दिले.  पण अनिरुद्ध कलादालन एका नियमाने, शिस्तीने चालवावे यासाठी याची धुरा दोन ऍडमिननी सांभाळावी असे मार्गदर्शन ही केले आणि त्यानूसार अनिरुद्ध कलादालनची जबाबदारी सध्याच्या दोन ऍडमिनवर आली. अनिरुद्ध कलादालनची शिस्त, कलेचे संरक्षण, संवर्धन नीट व्हावे य उद्देशानेच ऍडमीन ठरविण्यात आले. थॊड्याच दिवसात परमपूज्य बापूंकडूनही "अनिरुद्ध कलादालन"च्या टीमला कौतुकाचा फेटा दिला आणि परमपूज्य नंदाईने तिच्या कौतुकाचा मानाचा तुरा "अनिरुद्ध कलादालन"च्या फेट्यात खोवला.

अनिरुद्ध कलादालन म्हणजे काय?

अनिरुद्ध कलादालन म्हणजे असा संघ की जिथे सर्व श्रद्धावान कलाकार एकत्र येऊन आपल्या लाडक्या सदगुरुचे आपापल्या कलेतून गुणसंकीर्तन करतात. आपली कला या गुणसंकीर्तनाच्या माध्यमातून सर्वांपूढे मांडण्याची संधी अनिरुद्ध कलादालनमध्ये प्राप्त होते. डिझायर्न्स प्रामूख्याने ऍक्टीव्ह जरी असले तरी हळू ह्ळू म्युझिक, व्हीडिओ, ऍनिमेशन, लेखक व कवी हे देखील ऍक्टीव्ह झालेले आहेत.

अनिरुद्ध कलादालनाचे उद्दीष्ट काय?

खर तर कलात्मक गुणसंकीर्तन हेच एकमेव उद्दीष्ट असले तरी...श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन या संस्थेच्या विविध कामात खारीचा वाटा उचलण्याचे काम ही अनिरुद्ध कलादालन करीत आलेले आहे आणि पुढेही करत राहील.

अनिरुद्ध कलादालनमध्ये सहभागी कसे व्हायचे?

अनिरुद्ध कलादालनमध्ये सहभागी होण्याची सोप्पी पद्धत आहे. ती म्हणजे ब्लॉगला जाऊन रजिस्टर फॉर्म भरावयाचा आणि इमेलच्या मार्फतच पुढील कम्युनिकेशन होते. एकदा का रजिस्ट्रेशन कन्फर्म झाले की मेंबर त्यांची कला मेल द्वारे पाठवू शकतो.

अनिरुद्ध कलादालनमध्ये कला सादर करण्याची प्रक्रीया काय आहे?

अनिरुद्ध कलादालनमध्ये कुणीही कला सादर करु शकत असला तरी ती प्रकाशीत करण्याचा अधिकार ऍडमिन्सकडे आहे. काही मार्गदर्शक सूंचीप्रमाणेच कोणतेही आर्टवर्क, लेख, कविता, व्हीडीओ, म्युझिक इत्यादी कला अनिरुद्ध कलादालनच्या लोगोनिशी प्रसिद्ध होतात. जर कशातही बदल करण्याची आवश्यकता वाटत असेल तर तसे सजेशन अनिरुद्ध कलादालन कडून दिले जाते. ते मान्य करायचे की नाही ते प्रत्येक श्रद्धावान कलाकारावर अवलंबून आहे. अनिरुद्ध कलादालन प्रत्येक गोष्टीत क्वालिटी सांभाळण्यासाठी किंबहुना ती जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांच्या मेंबर्सनी देखील ही प्रगती करावी ही माफक अपेक्षा आहे आणि याचा परिणाम असा झाला आहे की अनेक श्रद्धावान मेंबर्सच्या कलेत अधिक सुधारणा झालेली आहे. अनिरुद्ध कलादालनचे सर्व मेबर एकमेकांना नविन काही शिकण्यास मार्गदर्शन करीत असतात याचा फायदा प्रत्येकाला इंप्रोवायझेशनसाठी होतो. फक्त इथे येऊन शिकण्याची तयारी ठेवावी लागते. अनिरुद्ध कलादालन जॉईन करण्याआधी जर मी ५ ट्क्के कलेत प्रविण असेल तर मला १० ट्कक्यांपर्यंत तरी प्रगती साधायला हवी. मात्र यासाठी मन्यु (उत्साह) आणि चिकाटी आवश्यक आहे.

अनिरुद्ध कलादालन लोगो आणि नाव का प्रकाशीत करते?


प्रत्येक कलाकार हा स्वतःचे पूर्ण श्रम आणि प्रेम वापरुन कोणतीही कला सादर करीत असतो...तेव्हा त्याचे नाव आणि अनिरुद्ध कलादालनमुळे मिळालेली संधी ही त्या कलेची ओळख असते आणि ही ओळख जपणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे..कारण ही ओळखचोरी अर्थात कॉपीराईट ऍक्टचे उल्लंघन सहज होते. ते टाळण्यासाठी क्रेडीट लाईन्स टाकण्याचा कटाक्ष प्रत्येक आर्टवकला दिसून येतो. त्यामुळेच कॉपीराईट ऍक्टचे उल्लंघन झाल्यास ते उल्लंघन करणार्‍यास त्याची जाणिव करुन देणे सोप्पे जाते. तसेच ही आर्टवक जेव्हा फिरत फिरत कधी तरी प्रिय डॅड आणि नंदाईच्या समोर जातील आणि जर त्यांना कधी ती आवडली तर त्याखाली ते कुणी केले आहे हे नाव असावे ही आमची भॊळी समजूत आणि आशा आहे. त्यामुळे ही आर्टवर्क्स कुठेही वापरण्याची मुभा आम्ही दिलेली असून फक्त ती जशीच्या तशी वापरावी ही एवढीच अट आहे आणि आम्हाला खरच आनंद होतो जेव्हा ही आर्टवर्कस दुसर्‍यांच्या फेसबुकवर, ब्लॉगवर, साईसच्चरिताच्या पंचशील पेपरमध्ये, मोठी मोठी बॅनर्सम्हणून अनिरुद्ध कलादालनच्या लोगोसहित वापरतात.

अनिरुद्ध कलादालन हा अनिरुद्धाचाच स्टॅम्प आहे. आमचे कुणाचेही त्यात काहीही नाही. एका तत्त्वानुसार तो स्टॅम्प प्रत्येक आर्टवर अबाधित असणे गरजेचेचे आहे...आणि ते तत्त्व म्हणजे..                            

कोणाच्याही श्रमाचा भार। फुकट लवभार घेऊं नये॥२४६॥
कोणाहीपासूनि घ्यावे काम। परी जाणावे तयाचे श्रम।
लावावा जीवास ऎसा नियम।फुकट परिश्रम घेऊं नये॥२४६॥ 
त्यामुळे अनिरुद्ध कलादालनच्या आर्टवकवर क्रेडीटस देण्याचा नियम आम्ही पाळतो. अनिरुद्ध कलादालनच्या अनेक आर्टवर्कस पुन्हा एडिट केली जातात याबद्दल ते आर्टवर्क बनविणार्‍या व्यक्तीला आणि संपूर्ण अनिरुद्ध कलादालनच्या टीमला अपार दुःख होते. पण तरिही असे करणार्‍यास आम्ही नम्र विनंती शिवाय काहीच करीत नाही...कारण आमच्यामते ती व्यक्ती परमपूज्य बापूंनी लिहलेल्या श्रीमदपुरुषार्थातील "अस्तेय - अर्थात चोरी न करणे" या तत्त्वाबाबत अज्ञानी असतो. ज्याचे त्याचे अज्ञान दूर करण्याची जबाबदारी ज्याची त्याचीच आहे.

अनिरुद्ध कलादालन आणखी काय काय करते?

अनिरुद्ध कलादालनकडे जर कोणी काही डीझायन बनविण्याचा प्रस्ताव घेऊन आले तर त्याचा नीट अभ्यास करुन तो स्विकारला जातो. उदा. बॅनर्स बनविणे, काही आर्टवक बनविणे इत्यादी. परंतु अनिरुद्ध कलादालनमध्ये सर्व जण सेवेकरी म्हणून सेवा करीत असल्याने प्रत्येकाला किंवा कुणालाही वेळ असेल तरच हा प्रस्ताव घेतला जातो. यातही केवळ संस्थेशी संबंधीत भक्ती सेवेचे बॅनर्स किंवा आर्टवक बनविण्याचे काम घेतो. तेही त्या त्या सेवेला हातभार व्हावा म्हणून. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. कारण प्रत्येकजण आपली नोकरी धंदा सांभाळून येथे काम करीत असतो. त्यामुळे कुणावरही दबाव टाकला जात नाही. तसेच सध्यातरी वैयक्तिक पातळीवरही कुणालाही आर्टवक बनवून दिले जात नाहीत. अधिक माहितीसाठी aniruddhakaladalan@gmail.com वर मेल करावा. 

अनिरुद्ध कलादालन प्रक्टीस प्रोजेक्टस आणि कॅम्पेन्स?

अनिरुद्ध कलादालन आपल्या मेंबर्ससाठी छोटे छोटे प्रॅक्टीस प्रोजेक्ट आयोजित करते. यात नुकताच स्केच वर प्रोजेक्ट करण्यात आला. प्रत्येकाला बापूंचे चित्र काढायचे होते जेणे करुन आपोआपच बापूंचे ध्यान घडणार होते. तसेच फोटो एक आर्टवक अनेक असाही प्रोजेक्ट हातात घेतला होता. ब्लड डोनेशन कॅम्प आणि न्हाऊ तुझिया प्रेमेचा प्रोजेक्ट देखील हातात घेतला होता. पुढेही अनेक प्रोजेक्ट घेणार आहोत.

अनिरुद्ध कलादालन प्रत्येक सूचनांचे स्वागत करत असून अधिकाधिक चांगले कार्य करीत राहणे आणि टीमच्या प्रगतीसह टीम मेंबर्सच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. भविष्यात अनिरुद्ध कलादालन कडून अनेक नवनवीन गोष्टी मिळतील यासाठी आम्ही सर्वजण कार्यशील राहू. अनिरुद्ध कलादालनला कुणीही जॉईन होऊ शकतो.

अनिरुद्ध कलादालन टीम
अंबज्ञ
जय जगदंब जय दुर्गे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
ART - A special gift that the Almighty has gifted each one of us.. We, the gifted shraddhavans have joined hands and come together from all parts of world with a common belief that our "ART IS OUR DEVOTION" and therefore it shall be offered to HIS lotus feets.

"Aniruddha Kaladalan" is a virtual team of shraddhavans who excel in various forms of arts like Photography, Drawing, Painting, Animation, VFX, Music etc. We are passionate to exhibit and share our artworks with our shraddhavan friends through our website Aniruddha Kaladalan...

We welcome you to browse through our artworks on this website, which are inspired by our beloved Sadguru Aniruddha Bapu.
"Aniruddharpanamastu"

From,
Aniruddha Kaladalan Team
contact -
aniruddhakaladalan@gmail.com

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback