Image Bank Challenge


What is IMAGE BANK CHALLENGE

अनिरुद्ध कलादालनमधून अनेकविध ऍक्टीव्हीटी होत असतात. या ऍक्टीव्हीटीमधून प्रत्येकजण प्रगती करीत असतो. अशीच एक ऍक्टीव्हीटी आम्ही हातात घेतली होती...इमेज बॅंक..
म्हणजे विविध कन्सेप्टने आर्टवर्क्स तयार करायचे. पण ही मेज बॅंक करायची कशी? परिस्थिती अशी होती की डोक्यात कन्सेप्ट आहे पण उतरविण्याचे स्कील्स नाही आहेत. उदा. कॅलिग्राफी कशी करावी ही आयडिया आहे पण कॅलिग्राफी करता येत नाही. मग अशा परिस्थीतीत ज्याला कॅलिग्राफी येते त्याच्याकडून ते करवून घेणे. 

मग याच आयडियातून सुरु केले चॅलेंज. एकमेकांना चॅलेंज देऊन कलाकृती तयार करुन घेणे. एकमेकांना चॅलेंज तर देणार होतो पण ही स्पर्धा मुळीच नव्हती. ह्या इमेज बॅंक चॅलेंजची ऍक्टीव्हीटी सुरु झाली आणि प्रत्येक जण प्रथमच काहीतरी नविन करीत होता. ती गोष्ट आधी त्या श्रद्धावानाने कधीच केली नव्हती. खर तर हे चॅलेंजच होत कारण आपल्या डोक्यात काय आर्टवक आहे हे करणे अत्यंत सोप्पे आहे...पण दुसर्‍याच्या संकल्पनेनुसार आर्टवक करणे ही गोष्ट अत्यंत कठीण गोष्ट आहे....आणि ऍक्टीव्हीटीमधून प्रत्येक हे स्किल शिकला. समोरच्याला काय पाहीजे हे समजून घेणे आणि आपल्याला काय पाहिजे हे समोरच्याला नीट समजावून सांगणे. म्हणजे करणे आणि करवून घेणे या दोन्ही गोष्टी इथे शिकता आल्या. 

सुरवातीला एका ऍडमीनने दुसर्‍या ऍडमीनला चॅलेंज दिले. मग त्या ऍडमिनचे चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर त्याने आणखी दोघांना चॅलेंज दिले. मग त्यांचे चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांनी आणखी दोघांना चॅलेंज दिली. अशी साखळी सुरु झाली. येथे चॅलेंज स्विकारायचे की नाही याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला होतेच. तसेच इतरांचे चॅलेंज स्वतःहून पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे एक सो एक आर्टवर्क तयार झाले. हे आर्टवर्क उद्यापासून तुमच्या समोर येणार आहेत. इतकेच नाही तर ते चॅलेंज काय होते आणि ते कसे पूर्ण केले गेले हे देखिल तुम्ही पाहू शकता...

--- Click on logo ---जय अंबे जय दुर्गे
टीम अनिरुद्ध कलादलन

Comments

 1. Name : Pravinsinh Deshpande

  Poem :

  || हरी ॐ ||

  हे चक्रधरा अनिरुद्धा ,
  तुझे चक्र असे फिरू दे रे ,
  तुझ्या पादुकांची धूळ ,
  माझ्या कपाळी येऊ दे रे ,
  तुझ्या चरणांशी माझे ,
  भाळ लागू दे रे ,
  ब्रम्हाची पर:ब्रम्हाशी,
  भेट होऊ दे रे ,
  मलिन हे जीवन ,
  उजळून जाऊ दे रे ,
  हे सच्चिदानंदा अनिरुद्धा,
  आनंदाच्या या लहरी वर तरून ,
  भव पार होऊ दे रे.........
  सच्चिदानंद पादुका ऊत्सवाच्या अनिरुद्ध शुभेच्छा ......
  जय जगदंब जय दुर्गे
  || अम्बज्ञ ||

  Place : Nashik

  Email ID : vedant.deshpande.257@gmail.com

  ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback