गुरुवारच्या सांजवेळी तुझी साद ति कानी यावि
नेत्रातून जशी सुप्त नात्यांची किरणे निघावी
तुझ्या शब्दांचा भासतो हवेत सांज गारवा
जसा अलगद कोणी तो सूर्य क्षितिजावरी नेवून ठेवावा
चमचमणारे काजवे मनसोक्त ऊडू लागले
तरंगणारे नक्षञ जणू गुरुक्षेत्रमी भासू लागले
शरद पुनव अंबरात ऋतू तुझेच गुलाम
तुलाच फितूर सारे अधीर तुझ्या दर्शनास
.
चाफे कळी रुप तुझे दाटते माझ्या मनी
उधळे सुवास जसा चंदना मधुनी
पौर्णिमेच्या रात्री जसा निशिगंध बहरावा
भासाने तुझ्या तो चोहीदिषा दरवळावा
माथ्यावर तुझ्या ती चंद्र कोर अन चांदणी
तुझा पुढे अनुराया चंद्र सुर्य लोपती प्रकाशी
कस्तुरी मयूर शोभे तुझ्या मस्तकी
शाम निळा अनिरुद्ध माझा शोभतो सिंहासनी
ज्ञानरुपी अनिरुद्धा सदा तू तेवतो माझ्या मनी
जगण्याची ओढ मिळॆ बापू मला तुझ्या पासुनी
आता खूप जालिया मस्करी, हसतोस कारे हरी
तुझ्या सिंहाचे अपराध पोटात घालुनी, लवकर येरे दारी
-अभिजीतसिंह जोशी
Ambadnya
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback