नवे वर्ष हे फक्त प्रेमाचे.....



नवे वर्ष हे फक्त प्रेमाचे.....
सरले हे वर्ष जुने,
चैतन्य पसरले नव्या सूर्याचे,
प्रथम स्मरु आपल्या बापूंना,
नवे वर्ष हे फक्त प्रेमाचे...१

नवनवीन संकल्प करु,
विकल्पांना दूर सारू,
अनिरुद्धांच्या भक्तीमध्ये,
तन-मन अर्पण करु...२

बापू बापू हाच असावा ध्यास,
इतर न माझी कुठलीच आस,
बनू वानर सैनिक सक्षम,
होऊ बापूंचे दासानुदास..३

बापू घडो तुझी सेवा-भक्ती,
स्पर्धा नको वाढो तुझी प्रीती,
सर्वांना नववर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा,
बापू-आई-मामा चरणी हीच सदिच्छा...४

अंबज्ञ
प्रणिलसिंह टाकळे



Comments