Poem By Ketakiveera Kulkarni
धरीला असता एक बोट दादांचा
नाही होणार कडेलोट कधीच कुणाचा
देवयानपंथाच्या मार्गावरुनी
नेऊ शकतात फक्त हेच आम्हा
मऊ असा त्यांचा स्पर्श होता
व्याधी जाती पळूनि त्वरा
मृदु आवाजात हरी ॐ करुनी
धीर देऊ शकतात फक्त हेच आम्हा
त्यागाची ही एकच मूर्ती
डोळ्यांत फक्त प्रेमच प्रेम
तेजःपुंज अशा कायेतूनही शीतलता
प्रदान करु शकतात फक्त हेच आम्हा
शब्द यांचा खोटा करू शके न कोणी
यांची 'रेषा' ओलांडू शके न वाईट वृत्ती
वास्तवाचे भान ठेवण्या
शिकवू शकतात फक्त हेच आम्हा
बाबांच्या शिरी सदैव छत्र धरी हा
आईच्या आज्ञेत सदा राही हा
संकटातही भक्कम आधार
देऊ शकतात फक्त हेच आम्हा
आद्यपिपा काकांनी बाप्पाला अर्पिलेली
सूचित व समीर ही दोन खणखणीत नाणी
आयुष्यात श्रद्धा व सबुरी वाढवण्या
मदत करू शकतात फक्त हेच आम्हा
अशा ह्या लक्ष्मण भरताच्या जोडीला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
मोठी आई सदा ह्यांस पुरवीत राहो
ऊर्जा व प्रेमाचा अखंड साठा
सूचित दादा व समीर दादांना वाढदिवसाच्या खुप खुप अनिरुद्ध शुभेच्छा!!!
- केतकीवीरा कुलकर्णी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback