Poem : वानरसैनिक.......... by Abhijeetsinh Joshi


"वानरसैनिक"

ध्यान आमुचे अनिरुद्धांकित 
मन  आमुचे  नंदांकित 
तू  केलेस आम्हा सूचित 
आम्ही तुझे वानरसैनिक    

तू  आमचा  राम  राजा 
सुख करता तू दुख हरता 
आम्हा सर्वांसाठी अभयदाता 
तूची  एक  मनसामर्थ्यदाता 

प्राजक्ताचा सुगंध दरवळतो ,
अनिरुद्धा फ़क्त स्मरन्याने तुला,
पारिजातकाचा वर्षाव असतो
तु दाविलेल्या मधुफलवाटिके वरुनी सदा

प्रत्येक श्वासात तुला स्मरावे,
कना-कणात तुला जाणावे
अनिरुद्ध- अनिरुद्ध जपता जपता ,
मन हे आमुचे अम्बज्ञ व्हावे

व्याकुळ नेत्रांनी स्मरीतो तुला 
चरण-आतुर हातांनी नमितो तुला 
अबीर, गुलाल उधळीतो रंग 
सदा घडो हा गुरु सत्संग

निशिगंध होऊनी अर्पितो तुज 
चरण कमळ सुंगंध द्यावा मज 
शाम निळ्या "साद" घालतो तुज 
अनिरुद्धा तुझे अनुज्ञ असावे मज

- अभिजीत सिंह जोशी 

Comments