अनिरुद्ध एक्स्प्रेस
जीवनाच्या वाटेवरती संकटे असती ठायी ठायी
बापू अनिरुद्धाच्या गाडीत बैसला, त्याला कशाची काळजी ? ॥
संकटांचे डोंगर टाकीत मागे,
निघाली मोठ्या दिमाखात ती ॥
प्रारब्धाची लढण्या लढाई,
करितो समर्थ हा ’अनिरुद्ध साई’॥
मोठ्या आईचा पुत्र हा,करी निवेदन यात्रेकरुंसी
’अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’॥
अनिरुद्ध गती तिची, रामराज्य निघाली ती
बसावे गाडीत श्राद्धावानांनी करावे bye, bye संकटासी ॥
सोबत असती दादा-नंदाई
अनिरुद्ध नामे रंगली सारी ॥
निश्चिंत होऊनी बसावे ह्या बापूंच्या गाडीत
१०८ % नेई श्रद्धावानासी, ’रामराज्य’ स्टेशनावरी ॥
बापू अनिरुद्धाच्या गाडीत बैसला, त्याला कशाची काळजी ?॥
अनिरुद्धार्पणमस्तु,
अम्बज्ञ
- शैलजावीरा बामणे, दुबई .
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback