परशुराम जयंती


परशुराम जयंती

माय रेणूकेच्या सुता 
परशुरामा करूणाघना 
कलीयुगाच्या चरम सीमेवर भवसागर हा 

पार कराया आम्हांवरी कृपा करा 

जमदग्नी-रेणूकेचा पुत्र बनूनी वसुंधरे 
अवतरला महाविष्णूचा हा सहावा अवतार 
ब्राम्हतेज अन् क्षात्रतेजाने परशुसंगे

महीवर तळपे हा रणधुरंधर 

गुरुआज्ञापालना सदैव 
तो ऐसा तत्पर
परिसतां जमदग्नी मुखीचे बोल 

कापी प्राणप्रिय मातेचे शिर तो सत्वर 


गुरुआज्ञापालनाप्रतीचा हा 

तव अनन्यशरणागत भाव 
शिकवी आम्हा लेकरा पाजूनी 

गुरुभक्तीचे थेंबभरी तरी अमृत 
  
सहस्त्रार्जुन मातूनी करी 
तव पित्याचा वध 
कष्टी रेणूके सुखवण्या तया मारिले 

त्वां तात्काळ धरोनी क्रोध


सद्गुरु दत्तकृपेने प्रकटवशी

 पुनश्च सती रेणूके एकवार 
काय वानू बा भक्तमातेच्या 

ह्या तव अचिंत्य दानाचा महिमा थोर

कलीकालाने त्रस्त जनां उध्दरण्यां
सांकडे घाली तू आदिमातेला 
तव कृपाप्रसादे साकार करी तू

तिच्याच मंत्रमालिनी अवताराला  


फलस्वरुपे भूवरी 

प्रकटला मातरैश्वर्यवेद: 
परी मायचण्डिकेची कृपा जाणण्या 

असमर्थ मानवाची पाहूनी तू दुर्गत 


झटकण्या मनुजाची मरगळ थेट तू 

साधूनी देसी श्रीस्वस्तिक्षेम संवाद 
वाटे मम मनी दुष्ट दुर्जनां निर्दळण्या 
महादुर्गेचा देवीसिंह बनूनी तू होसी कटीबध्द 


समस्त श्रध्दावान लेकरां उध्दरण्या 

वसुंधरेवरी धरिसी गती तू अनिरुध्द  
अगाध शक्ती अघटीत लीला तुझ्या बा परशुरामा 
देई चरणी ठाव प्रार्थिण्या अनन्य भावे ठेवितो तव चरणी माथा    


सुनीतावीरा करंडे    

Comments