DAD माझा भक्तवत्सला,
झटतो सदैव भक्तकल्याणा
आरोग्यसंपदा हीच धनसंपदा ,
तपश्चर्येचे सार खरं खुरं,
देण्या आतुर आपल्या बाळा ||
आली धावत मोठी आई,
घेउनी 'गुह्यसुक्ता 'मन्त्रमयी ह्या वेदगीता
'श्रीश्वासम' मोठी आई -महाप्राण -त्रिविक्रमाचा ,
सहज, सोप्पं, मधुर-मधुर ||
मोठ्या आईची लाभेवीण प्रीत ,
पुरवी 'अरुला' महाप्राण,
प्रवाहित करी त्रिविक्रम चंडिका पुत्र,
चंडिकेचा हाच श्वास,
आपला करून घ्या हा त्रिविक्रम ||
मार्ग एकची 'श्रीश्वासम',
दवडू नका संधी मोलाची व्यर्थ
''Real Health comes from the connection of GOD'',
ठसवा मनी हे पक्के नीट ||
रहस्य जाणण्या अदभूत गोष्ट,
तयारी करू सारे आपण
लिहू वही 'रामनाम', जप करू,
'ॐ श्रीरामदुताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमोनमः ||
दुरुस्त करूया
आहार-विहार, विचार -आचार
ओत -प्रोत प्रेम घेउनी आली,
मोठी आई ''स्वस्तिक विद्या"
सज्ज व्हा हो श्रद्धावान,
DADच्या तपश्चर्येच अमृतपिण्या ||
अम्बज्ञ
शैलजावीरा बामणे
----------------------------------------
For more poems
Visit
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback