Poem - अनिरुद्ध चरणासी जावे विरघळून (by Nandkishorsinh Soman)



अनिरुद्ध चरणासी जावे विरघळून 
विसरून स्वत्व, फक्त अनिरुद्ध तत्व 

कोणताही विचार मनी न झळकावा 
मनी गुंजावा मंजुळ अनिरुद्ध पावा 

गोकुळी उभा कृष्ण घननिळा 
स्मीत हास्ये करी मुग्ध गोकुळा 

दह्या दुधाचा साखर चाळा
खेळात रंगला गोकुळी गोपाळा

अनिरुद्ध राज्य राम सकळ
भक्ती मार्गे केले जमा गोकुळ 

साई, स्वामी, हनुमंत प्रबळ 
जय जगदंब जय दुर्गे सबळ 

अनिरुद्धे उघडिले भव्य कवाड 
गवसले भक्ता स्वर्गीचे घबाड

सहज सोप्या दाविल्या वाटा 
भक्ता सामोरी परमेश्वर थाटा

झुके आपसूकच चरणी माथा 
अनिरुद्ध प्रेमे कवटाळे भक्ता 

- नंदकिशोरसिंह सोमण

Comments