POEM..... डॅड, आमचा तू लाडका..... (by Pranilsinh Takle)




डॅड, आमचा तू लाडका.....
बाबा,
     ह्या नात्याची गोड ओळख घडवणारा,
     बाळांचे असंख्य लाड पुरवणारा,
     डॅड, आमचा तू लाडका....१
    मोठया आईच्या कुशीत राहणारा,
    नातवांनाही तिच्या अमर्याद प्रेम करणारा,
    डॅड, आमचा तू लाडका....२
     अनेकदा चुकूनही सतत तू सावरणारा,
     प्रारब्धांच्या चटक्यात शीतल सावली देणारा,
      डॅड, आमचा तू लाडका....३
      हाक मारण्याआधीच कुशीत घेणारा,
      बाळांवरची संकटे स्वतःच  झेलणारा,
      डॅड, आमचा तू लाडका....४
     आजही अगदी भरभरून  खजिना देणारा,
     त्याच अकारण प्रेमातून अंबज्ञ बनविणारा,
      डॅड, आमचा तू लाडका....५
    जन्मजन्मांतरीचे नाते अबाधित राखणारा,
    माझ्या श्वासात अन् देहांत समरसणारा,
    डॅड, आमचा तू लाडका....
    डॅड, आमचा तू लाडका....६
आय लव्ह यू माय डॅड .....
- प्रणिलसिंह टाकळे

Comments