माझ्या गुरूची शाळा... (Poem by Pranilsinh Takale)



माझ्या गुरूची शाळा...

बसण्यासाठी बाक बापू,
पाठीवरची झोळी बापू,
झोळीतली पुस्तकं बापू,
सर्वकाही माझा तूच बापू...१
पाठीही तू पेन्सिलही बापू,
समोरचा मोठा फळा बापू,
शिक्षकही तूच रे बापू,
सर्वकाही माझा तूच बापू...२
बाजूचा मित्रही तू बापू,
शाळेची घणघणती घंटा बापू,
डब्यातला गोड खाऊही तू बापू,
सर्वकाही माझा तूच बापू...४
घरी येताना पालक बापू,
उन्हातली सावलीही बापू,
माझे आता काय उरले,
सर्वकाही माझा तूच बापू...५
प्रत्येकक्षणी असेन मी शिष्य,
पण तूच गुरु हो बापू,
शिकवणीचे ऋण कसे फेडू,
माझी गुरुदक्षिणाही तूच बापू...६
गुरुपौर्णिमेच्या अनिरुद्ध शुभेच्छा...

- प्रणिलसिंह टाकऴे


--------------------------

Comments