बाप्पा तू आलास अन (Poem by : Ketakiveera Kulkarni


बाप्पा तू आलास अन

वाळवंट झालेल्या ह्या जीवनात
उगवलेले रुक्ष काटेरी झुडपे
ना होता त्यात भावनांचा ओलावा
नव्हते कधी त्यात पाणी प्रेमाचे
पण बाप्पा तू आलास अन
तुझ्या प्रेमाचे असे सिंचन केले
की ह्या वाळवंटात भावभरित चंद्रभागेचे
नितळ शुद्ध मधुर असे पाणी वाहू लागले

आगीनेच भरलेल्या ह्या जीवनात
पेट घेतलेला क्रोधाच्या ज्वालामुखीने
द्वेष अन मत्सराच्या वणव्याचा
दाह सोसत जळत होते हे अंग सारे
पण बाप्पा तू आलास अन
हळूच फुंकर अशी घातली प्रेमाची
की दाह सारे शांत झाले
वाहू लागले त्यात आनंदाचे वारे

सुकलेले तळे झालेल्या ह्या जीवनात
दगड साचलेले फक्त मोहाचे
स्वार्थी अन कपटी स्वभावाने
शुद्ध व मर्यादेच्या पाण्यास मीच अडवून धरले
पण बाप्पा तू आलास अन
लाट एक अशी सोडलीस प्रेमाची
की सुकलेल्या तळ्याचा सुंदर समुद्र झाला
अन त्यात वाहू लागले पाणी फक्त तुझ्या प्रेमाचे

बाप्पा...
फक्त प्रेम अन प्रेमच तू आम्हाला देत राहिलास
तुझ्या प्रेमाच्या छायेतच आम्हाला वाढवत गेलास
गुरु अन बाप बनूनी तू आमचा
आमचे बोट धरून आम्हाला चालवत राहिलास

आज गुरुपौमेच्या ह्या दिनी
तुझ्याच पाण्यात वाढलेले तुझेच हे रोप अर्पिते
तूच शिवून दिलेली ही फाटकी झोळी
तुझ्याच चरणांत मी वाहते

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना अनिरुद्ध शुभेच्छा...

बापूराया तू खुप प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी

Comments