वारी करावी एकदा तरी... (Poem by Pranilsinh Takale)



वारी करावी एकदा तरी...
इच्छा वसे सदैव मनी,
वारी करावी एकदा तरी..१

देहभान संपूर्ण विसरूनी,
पायी उन्हांतान्हांत चालूनी,
भूकेची न चिंता करूनी,
वारी करावी एकदा तरी...२

वारक-यांचा उभा पंढरीनाथ,
भक्तांना देण्या आजान्म साथ,
श्रीगुरुक्षेत्रममध्ये माझा सावळा,
त्रिविक्रम तोच अनिरुद्धनाथ...३

तुऴशीची पाने अर्पूनी,
वारीचे पुण्य पावोनी,
सुखांत नांदू आपण आज,
विठूरुप मनी साठवूनी...४

श्रीगुरुक्षेत्रम् हीच माझी पंढरी,
आषाढीची इथेच घडते वारी,
अठ्ठावीस युगे उभाच रे तू,
आज घे विश्रांती क्षणभरी...
आज घे विश्रांती क्षणभरी....५

-    प्रणिलसिंह टाकळे

--------------------
AMBADNYA

Comments