A very very happy friendship day..


ह्या जीवनाच्या ताटामधे
तिखट गोड चविष्ट की कडू
हे काय व कसे वाढले आहे
हे ठाऊक असते फक्त तुलाच

कुवतीनुसार प्रत्येकाच्या
ही ताटंही तूच वाढून ठेवत असतोस
आणि प्रत्येक घास त्या ताटामधला
तूच आम्हाला भरवत असतोस

स्पर्श होताच तुझ्या हातांचा
कडू घास ही अगदी गोड होइ
बेचव काही कधी आल्यास
त्यास ही चव तूच पुरवी

ठसका लागलाच मधे कधी
तर पाणीही आम्हास तूच पाजी
जिथे तुझा हात तिथे अपचन नाहीच कधी
पण तरी जर झालेच तर त्यावर उपाय ही तूच करी

असा आहेस तू एक आदर्श
खरखुरा आणि माझा एकमेव सखा
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात
सोबती म्हणून तू असतोसच उभा

ना कधी तू दगा देसी
ना कधी तू सोडुनि जाशी
आम्ही कित्तीही कित्तीही चुकलो तरी
तुझे प्रेम तू कधी न आटवी

बाप्पा...
तुझे सख्यत्व लाभले ज्याला
तोच श्रीमंत आणि भाग्यशाली खरा
ताटाभोवती रांगोळीही असते त्याच्याच
अन ताट ही त्याचेच असते संपूर्ण भरलेले सदा

शिरी वरदहस्त असता तुझा
नाही आता कसलीच तमा
तुझ्याच संगे आम्ही लूटत आहोत
आस्वाद ह्या मिश्रीत जीवनाचा

खूप खूप अंबज्ञ बापुराया
तू खुप प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे

A very very happy friendship day..
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी

Comments