Designed and Poem By :- Supriyaveera Narvekar
आस लागली बापू मला
तुझ्या दर्शनाची …
खूप दिवस झाले
बापू पाहून तुला
कधी रे भेटणार
तू आम्हां बाळांना
ऐक रे हाक बापुराया तुझ्या बाळांची
आस लागली बापू मला
तुझ्या दर्शनाची …
"हरि ॐ" ऐकण्या आसुसला
श्रीहरिगुरुग्राम सारा
बरसू दे बापू लवकर
तुझ्या प्रेमाच्या धारा
आठवणीने ओलावली कडा नयनांची
आस लागली बापू मला
तुझ्या दर्शनाची …
काळजी आम्हां
बाळांची तुला सतत
सांभाळासी तुझ्या लेकरांना
मोठ्या आई समवेत
घालिते तुजसाठी पायघडी भक्तीची
आस लागली बापू मला
तुझ्या दर्शनाची …
किती रे करतोस प्रेम
तू आम्हां बाळांवर
भेटण्या आम्हां
आता ये तू सत्वर
आळविते अनिरुद्धा तुला नात मोठ्या आईची
आस लागली बापू मला
तुझ्या दर्शनाची …
आई , मामांसंगे होऊ दे
लवकर तुझे दर्शन
दिसू दे साऱ्या
भक्तांना सद्गुरुचरण
शमू दे बापू तहान आता तुझ्या बाळांची
आस लागली बापू मला
तुझ्या दर्शनाची …
- सुप्रियावीरा नार्वेकर
-----------------------------------
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback