Poem : दीप सुरेख लावून... (by : Pranilsinh Takale)


आईचा वाढदिवस...

भिरभिरती नजर तुज शोधते गं आई,
      जैसी भुकेल्या बाळा असे दुधाची घाई..१

जाणवते तुझे मला सतत अस्तित्व,
      तुझ्याचमुळे लाभले मला हे पुर्णत्व..२

तुझिया पंखाखाली बसण्या आतूर मी निवांत,
      तुला पाहताच होई मन माझे पुर्ण शांत..३

तुझ्या स्वरांनी शब्दांनाही चढे सुंदर साज,
      त्याच "हरि ॐ बाळा" ची आठवण येतेय आज..४

तुझ्या पदराशी खेळण्याचा गं छंद माझा,
      तुला पाहताच थबकतो श्वास हा माझा..५

कोलाहलत्या मनाला हवी तुझी एक नजर,
      पोळलेल्या जीवनावर घाल हळूवार अशी फुंकर..६

कष्टतेस मजसाठी अशी गं रात्रंदिवस तू,
      खुपले जरी तुजला तरी कधी न भासवणारी तू..७

आई तुझ्या विरहाने दाटून बघ कंठ आला,
      तुला पाहण्या माझा जीव आतूर गं झाला..८

माझ्यामुळे तुला आनंदी झालेले बघायचे आहे,
      तुझ्या कोमल चरणांशी एकनिष्ठ रहायचे आहे..९

आई तुला अनंतपटीने वाढदिवसाच्या शुभेच्छा,
      मनीच्या माझ्या पुरवी तुच सर्व इच्छा..१०

आई आई आई म्हणताच
      येसी तू अवचित धावून,
तुझ्यासाठी आई करितो आरास,
      आज दीप सुरेख लावून..
      आज दीप सुरेख लावून...११

आई.....गं,
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा...

- प्रणिलसिंह टाकळे

Comments