ये ना रे बापू तू,
मन खूप हळवं झालेया...
ये ना रे बापू तू,
तुझ्या दर्शना सगळे आलेया...
ये ना रे बापू तू,
हरीगुरूग्रामही तुझ्यासाठी नटून थटून सजलेया...
ये ना रे बापू तू,
तुझी बाळ आस लावूनी बसलेया...
ये ना रे बापू तू,
मन नुसतं कावरं बावरं झालेया...
ये ना रे बापू तू,
प्रश्नांच्या पावसाने वेड्यासारखं झालेया...
ये ना रे बापू तू,
ह्या जीवांस शांत करुनी
तुझ्या चरणी कटिबद्ध कराया...
ये ना रे बापू तू,
ये ना रे बापू तू...
अंबज्ञ.
- अनुप्रियावीरा आदित्यसिंह सावंत.
(अनिरुद्ध कलादालन)
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback