बापू तू येशील ह्या जाणीवेने
मन बेभान झालंय रे.
उंच उंच आकाशात झेप घेऊन
आल्यासारखे झालय रे.
मनातली मरगळ कुठल्या कुठे पळून गेलीय,
मन पुन्हा नव्याने उल्हासित झालंय,
तुझ्या भेटीच्या ओढीने मन माझं आतुर झालंय.
येणार येणार येणार माझा बापू
मज भेटण्या येणार,
आमच्यापेक्षा बापू तुलाच ओढ दुप्पट
आम्हाला भेटण्याची असणार,
तूझं प्रेमच न्यारं बाळांसाठी.
काय करू काय नको असं झालंय बापू,
कधी तुला डोळेभरून पाहतेय असं झालंय बापू.
तुझी एक झलक, आय लव यु माय dad चे सॉंग,
वातावरणातील आल्हादायकता पुन्हा,
नव्याने अनुभवायला मिळणार,
आमचा बापू आम्हाला भेटायला येणार.
आमचा बापू आमच्याशी हसणार,
आमच्या बापू आमच्याशी बोलणार,
बापू तुझी एक झलक, बापू तुझी एक नजर,
आम्हाला पुन्हा पुन्हा तुझं प्रेम नव्याने मिळणार.
खरा तर तू आमच्या जवळच होतास,
पण आता तू आम्हाला प्रत्यक्षात दिसणार,
बापू बापू बापू खूप मस्त वाटतंय रे.
खरं तर तुला बघून आम्हाला शब्दही सुचणार नाहीत,
मनाची भाषा मनाला डोळ्यांनीच हेरली जाईल.
तुझ्या त्या डोळ्यांनी मिचकावून बोलशील आम्हांशी,
तुझा वरदहस्त, तुझी नजर, आणि तुझे स्मितहास्य,
सगळ काही मनातून नजरेला सांगून जाईल.
आय लव यु माय dad फॉरएवर
अंबज्ञ.
- अनुप्रियावीरा आदित्यसिंह सावंत
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback