कुणास लाभेल का असा एकांत
तो आगळाचं प्रत्येक श्रावणी सोमवार
घेवून येई समृद्धीचे भांडार
तुझे नि माझे नाते देवा, हिच खरी संपत्ती
शारण्यभाव जपण्यासाठी….
मग….चला करुया नं "श्रीरणचण्डिका प्रपत्ती"….. १
प्रारब्धावर केलास वार
होऊनी संकटांवर स्वार
कष्टविलीस आपली काया
आठवू देत तुझी ती आभाळमाया
क्षणोक्षणी जपण्यास मला
ओढवून घेतलीस स्वतःवर आपत्ती
प्रतिपाळकर्त्या त्रिविक्रमास अंबज्ञ म्हणूया……
मग….चला करुया नं "श्रीरणचण्डिका प्रपत्ती"……..२
श्रीचण्डिकेचा पुत्र होवूनी
धरणीवरी अवतार घेवूनी
श्रद्धावाणांचा आधारस्तंभ तू
कणाकणाला सांभाळणारा जातवेद तू
सदैव आज्ञेतच राहू दे
निजकार्यास घे साधुनी तू
इथेच मिळते खरी शाश्वती
निष्ठा वाढवायची आहे ना……..
मग….चला करुया नं "श्रीरणचण्डिका प्रपत्ती"……३
माय चण्डिकेने जवळ घेतले
तुझ्याच हाती मज सोपविले
किती हे सुंदर आपुले नाते!
अखंडतेचि ग्वाही देते
ओटीत तुझ्या मज तिने घातले
रम्य शुभंकर ती आकृती
प्रार्थनेस हात जोडूया….
मग….चला करुया नं "श्रीरणचण्डिका प्रपत्ती"……४
त्रिविक्रमा तो प्रत्येक श्रावणी सोमवार
जाणीव करून देतो तूच एकमेव आधार
मज यशस्वी करण्यास कष्टतोस
रात्रंदिवस मजसाठीच तिष्ठतोस
दिलीस तू प्रपंच्याच्या लोण्यावरी अध्यात्माची साखर
माझ्यासाठी धावत येतो हा कारुण्याचा सागर
घरबसल्या मिळते आहे अध्यात्माची तृप्ती
तुझ्याच प्रेमापरी त्रिविक्रमा, वर्धामानूदे भक्ती
सांजावलं वेळ जाहली……
मग….चला करुया नं "श्रीरणचण्डिका प्रपत्ती"…… ५
काळा मागून काळ जाईल
गेली वेळ ना परत येईल
प्रपत्तीची हि पाच तत्वे
हात त्रिविक्रमाचा घट्ट धरील
नृसिंहा सामोरी सिंह बैसला
कधी नं जीवनी वाया गेला
ठेविले मस्तकावरी क्षणभरी
त्रिविक्रमा दिलीस शांतातेहूनी शांती
तो पहा त्रीविक्रम कधीचा येवून बैसला…..
मग…चला करूयाचं "श्रीरणचण्डिका प्रपत्ती" ........ 6
अंबज्ञ
- संतोषसिंह कृष्णा राणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback