"घाल घाल पिंगा वाऱ्या" ह्या सुंदर मराठी गीताच्या चालीवरून
आपल्या प्रेमळ नंदाईला वाढदिवसाच्या अनिरुद्ध शुभेच्छा!!!
बोलविता वाऱ्या तुला, येरे घाई घाई
नंदाईच्या कानी सांग Happy Birthday आई!!!!
दिसलीस नाही मला, किती दिस झाले!
दर्शनास आई तुझ्या, मन माझे ओले
स्तब्ध झाले झाडे वेली, पाऊसही स्तब्ध
वारा बघ घेवून येई, चाफ्याचा सुगंध
थांबल्यात दारापाशी, श्रावणाच्या सरी
गौराई माय माझी, दिसे हो गोजिरी
बाबा मामा आनंदले, प्रेम पूर येई
शुभेच्छा आणि काव्यांचा तो वर्षाव होई
सरताना आषाढही आनंदात न्हातो
आलीस तू माझ्या घरी दिवा खुणावतो
आई, आई, आई असे त्रिवार स्मरताना
आनंदाला पूर येतो तुज पाहताना
आषाढाची आवस, तुझा वाढदिवस आई
हर्षले चंडिकाकुल, केली दिव्यांची रोषणाई
बोलविता वाऱ्या तुला, येरे घाई घाई
नंदाईच्या कानी सांग Happy Birthday आई!!!!
Happy Birthday आई…..आई…..आई
अंबज्ञ
- संतोषसिंह कृष्णा राणे, सांताक्रूझ (पूर्व)
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback