अनिरुद्धा रे गोपाला…………….


अनिरुद्धा रे गोपाला……………. 

आषाढ सरला, श्रावण आला
समजेना कुठे हा नटखट गेला?
प्रारब्ध माझे झेलीत सखा हा
सुदाम्याच्या भेटीस आतुरलेला
अनिरुद्धा रे गोपाला……………. 

आनंदाचे क्षण मोहरले
आनंदाश्रूंचे मोती झाले
श्वास थबकला हिंदोळ्यावर
बैस थोडा झुलवू झुला
अनिरुद्धा रे गोपाला…………….

भांबावली वेळ पहा ही!
तुझ्या दर्शना आतुर झाली
पाऊस नव्हता, तरीही परंतु
किती काळ हा वाहून गेला
अनिरुद्धा रे गोपाला…………….

तुझ्या पाऊलांसाठी रस्ते आणि वाटा
भरून काढतील आज सारा तोटा
उघडतील कवाडे, पडतील नजरा
मग होईल भक्तांचा कल्ला
अनिरुद्धा रे गोपाला…………….

गोपाळाची गाई वासरे
हरिगुरुग्रामी आज जमतील सारे
प्रेमाच्या मटकीमध्ये आनंदाचा काला केला
नंदारमणा अनिरुद्धाचा…………
जयघोष सृष्टीत निनादला
अनिरुद्धा रे गोपाला……अनिरुद्धा रे गोपाला…… अनिरुद्धा रे गोपाला………

 अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे (Aniruddha Kaladalan)

Comments