आलाय... गणेशोत्सवाचा सण..


आलाय... गणेशोत्सवाचा सण..

डॅड...
तुझ्या आमंत्रणाने भारावले मन,
बाप्पाच्या दर्शनाला येतील जन,
हक्काच्या बापाचा येणार बाप्पा,
कारण, आलाय गणेशोत्सवाचा सण....१

श्रीगुरुक्षेत्रम संपूर्ण सजेल आज,
आगळाच थाट असेल सरताज,
बाप्पाच्या अस्तित्वाच्या निमित्ताने मग,
अनुभवता येईल स्वर्गाचा साज...२

रांग उसळेल पुन्हा श्रद्धावानांची,
आस मनी गणरायाच्या दर्शनाची,
पर्वणीच असेल मग तेव्हा,
जेव्हा सांगड मिळेल त्यात बापू मिलनाची...३

उत्सवाचे बदलले स्वरुप जरी,
तरी भाव मनातला तोच असेल,
बाप्पाच्या बाप्पाला भेटण्याची,
अगतिकता आधीपेक्षा जास्तच असेल...४

हे गणराया,
तुझ्या आगमनाने अवकर्षण कर कमी,
जो तो रंगु दे तुझ्या गोड नामी,
श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रमची ही गणेशवारी,
घडो सर्व श्रद्घावानांना जन्मोजन्मी...५

गणेश चतुर्थीच्या अनिरुद्ध शुभेच्छा...

Aniruddha Kaladalan - Poem by : - प्रणिलसिंह टाकळे

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback