"तो" येतोय !!


आजीच्या कृपेने भेटीचा मुहूर्त आहे ठरला,
लगबग झाली सुरु, आनंदाचा नाही ठाव ठिकाणा.
श्रीहरिगुरुग्राम पुन्हा एकदा सजतोय,
कारण....."तो" येतोय !!

तैयार आहेत ताट पुष्पावृष्टीसाठी,
दीप आहेत आतूर प्रज्वलित होण्यासाठी.
एक कमालीचा उत्साह सर्वत्र जाणवतोय,
कारण....."तो" येतोय !!

'हरी ॐ'चा सुर उमटेल "त्याच्या" मुखी,
भावनांचा बांध फुटेल सर्वांच्या नयनी.
मनोमनी आपण सारे फ़क्त घटिका मोजतोय,
कारण...."तो" येतोय !!

एक अद्भुत घटना आपल्याच जीवनी घडणार,
कृष्णजन्मागोदरच कृष्णाचे दर्शन होणार !
ह्या विचारानेच प्रत्येक जीव भारावून जातोय,
कारण...."तो" येतोय !!

आली आहे जवळ ती सुवर्णघटिका,
त्याच्या स्मितहास्याची आस लागी मनाला.
Dad आम्ही आतुरतेने वाट पाहतोय,
कारण आम्हाला माहित आहे...तू येतोय !!

अंबज्ञोस्मी
अनीकेतसिंह गुप्ते (अनिरुद्ध कलादालन )

Comments