गुरुच्या ह्या गोड शाळेला वीस वर्षे झाली बघता बघता....




गुरुच्या ह्या गोड शाळेला
वीस वर्षे झाली बघता बघता
पण ह्या शाळेतील नाविण्य
बहरत राहिले क्षणाक्षणाला

कित्येकांनी आधिपासून
घेतला ह्या शाळेचा आसरा
तर काही जणांना येण्यास मात्र
'थोडा'सा उशीर झाला
पण तरीही ह्याने शाळेत ह्याच्या
विगताप्रमाणे सर्वांना सामील करून घेतले
सुगति बनण्यासाठी खुल्या केल्या
अनेक नवविध सुरेख वाटा

पापणी मिटण्या अगोदर
होतो भोगत नरक यातना
पण पापणी उघडताक्षणीच
मिळू लागतो आनंद स्वर्गातला
नक्कीच असाच अनुभव आलाच असेल
आपल्यातील इथे प्रत्येकाला
ह्या गुरुच्या शाळेमधे
बेभान होऊन वावरतांना

लहान बाळाचे संगोपन जसे
वीस वर्षात पालक अन शिक्षकांकडून होते
अगदी तसेच माय अन शिक्षक बनून
सांभाळले आहे ह्याने आपल्याला

आता शिक्षण सारे संपवून
हा शिक्षक एक निव्वळ बाप म्हणून आला
त्याच्या प्रत्येक बाळाचा संसार सुखी करण्या
हा अवघा अनिरुद्ध पूर्ण कार्यरत झाला

माझ्या प्रत्येक हाकेला ओ देतांना
नाही कधी ह्याचा घसा कोरडा पडला
मला पाटी पेन्सिल घेऊन शिकवतांना
नाही कधी ह्याचा हात दुखला

ह्या समर्थ अशा बापाचे सिंह अन वीरा म्हणून
आपले ही कर्तव्य आहे आता
त्याच्या ह्या अकारण कारुण्याला
जमेल तसा प्रतिसाद देण्याचा

मला अ ब क ड शिकवणाऱ्या
अन छड़ीचा धाक घालणाऱ्या माझ्या शिक्षकाला,
माझ्या आयुष्याचा 'श्रीगणेशा' करून देणाऱ्या माझ्या देवाला,
मला सतत आणि सतत आधार देणाऱ्या माझ्या सवंगड्याला,
आणि मला कवेत घेऊन घट्ट उराशी पकडून ठेवणाऱ्या माझ्या बाबांना
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

A very very Happy Teacher's Day Dad
I love you forever..

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी (aniruddha Kaladalan)

Comments