जादू ‘डॅड’च्या प्रेमाची



जादू ‘डॅड’च्या प्रेमाची

कशाला घाबरताय बाळांनो, मी आहे ना!
डॅडच्या एका बोलाने
काय जादू केली सांगू मित्रांनो.......
असा तुम्ही आस्तिक वा नास्तिक
जेव्हा प्रथमच झाली नजरानजर माझ्या डॅडाशी
कनेक्शन जुळले क्षणांत हृदयाचे त्याच्याशी
त्याच्या डोळ्यांतून झिरपत होता अखंड प्रेमाचाच झरा
आणि चिंब भिजवून टाकले प्रेमाने अवघे एका क्षणांत
ज्याचा शोध घेता घेता थकल्या होत्या सार्‍या वाटा
पटली खूण ह्याच्याचसाठी होता सारा आटापिटा

कशाला घाबरताय बाळांनो, मी आहे ना!
डॅडच्या एका बोलाने
काय जादू केली सांगू मित्रांनो......
होतो अडखळत, धडपडत चुकीच्याच प्रांतात
दु:खाच्या-संकटांच्या-नैराश्याच्या राशी उपसत
झालो होतो अगतिक, साद घातली करूणेने
उचलले डॅडाने अलगद, नेले प्रगतीच्या मार्गाने
हळुच उमटले हास्य, निवळले होते ढग सारे
यशाच्या दाही दिशा खुणावत होत्या प्रेमाने
आता फक्त राजमार्ग, शुभ्र धवल प्रकाश
डॅडाच्याच प्रेमाचे, भरून राहिले अवकाश

कशाला घाबरताय बाळांनो, मी आहे ना!
डॅडच्या एका बोलाने
काय जादू केली सांगू मित्रांनो.......
सगळी टेन्शन्स गेली,
कापरासारखी उडून
सगळ्या भीत्या गेल्या,
त्या भाववेड्या मनातून
आता फक्त नाचत होती,
आनंदाची थुईथुई कारंजी
कारण घट्ट पकडला होता,
हात माझा, माझ्या डॅडानी

अंबज्ञ
- कल्पनावीरा नाईक (Aniruddha Kaladalan)

Comments