गोड गुरूची शाळा ---
आठा दिवसा गुरुवारी
भरते शाळा हरीगुरुग्रामी ||
भरते शाळा हरीगुरुग्रामी ||
विद्यार्थी असती श्रद्धावान
जमती हजारोंच्या संख्येत ||
जमती हजारोंच्या संख्येत ||
भरती होण्या शाळेत
बंधन नसे कुठलेच ||
बंधन नसे कुठलेच ||
वृद्ध-प्रौढ ,बाल-कुमार
रमती सारे एकाच वर्गात ||
रमती सारे एकाच वर्गात ||
उच्च -नीच ,गरीब -श्रीमंत विसरुनी भेदभाव
होती हृदयी अवघे अनिरुद्धमय ||
होती हृदयी अवघे अनिरुद्धमय ||
गुरु आगमना उत्सुक सारे
गाती एका सुरात
गाती एका सुरात
गुरु बोलता स्तब्ध सारे
कान देऊनी ऐकती शब्द तयांचे ||
कान देऊनी ऐकती शब्द तयांचे ||
आनंदाचे डोही आनंदतरंग
उठत राहती अंतरी जनांचे ||
उठत राहती अंतरी जनांचे ||
गुरु आमचा आगळा
जाणितो वर्म सकला ||
जाणितो वर्म सकला ||
मिळती गुरु प्रवचानातुनी
अडचणींवर उपाय सारे ||
अडचणींवर उपाय सारे ||
काय गुरूची शाळा गोड
आठवते मज राहून राहून ||
आठवते मज राहून राहून ||
अनिरुद्धार्पन्मास्तु
अम्बज्ञ .
- शैलजा वीरा बामणे (Aniruddha Kaladalan)
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback