मोठ्या आईचा पाचवा अवतार ‘शताक्षी’वर केलेली कविता (मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथावर आधारित)


शताक्षी...

असूरसंहारासाठी झटणारी तू माता,
पुत्रांना तू  प्रदान करण्या अभय,
वत्सल, अन्नदा स्वरुप ही गं तुझे,
शांत, भावोत्कट अन् आहे सौम्य...१

सत्ययुग संपले,  धर्माचरण संपले,
पवित्र मंत्र, भक्ती सर्व त्यागिले,
उचित चालणारे निसर्गचक्र चालवणारे,
मित्र-वरुणानि प्रचंड कोपित झाले...२

लोटले ह्यात असेच एक शतक,
हिरवी पाने- फळे दिसणे झाले  दुर्मिळ,
ह्या पृथ्वीपुत्रांच्या सहाय्यासाठी,
देवीसूक्त म्हणती ऋषीजन प्रेमळ...३

पराम्बा प्रकटली तव पुत्रांसाठी,
विनवले सर्वांनी दे एक नजर,
पृथ्वीवर माजला हा हाहाकार,
अन्न-पाण्याविना होऊ लागली उपासमार..४

शताक्षी नाम धारण केले,
होती ती  संपूर्ण नीलवर्णाची,
अष्टभुजां अशी ती शाकंभरी,
कृपा कटाक्षे सुधरी दैना पृथ्वीची..५

श्रीश्वासम् उत्सवात घडले दर्शन तुझे,
बापूराया ह्यासाठी आम्ही अंबज्ञ तुझे,
अन्नपूर्णा वत्सले गातो तुझा गजर,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...६


Poem By : Pranilsinh Takale,     Design By : Truptiveera Sonde
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)

Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale

Comments