मंत्रमालिनी...
गायत्री माते तुच चिदाकाशस्वामिनी,
तुच गं महिषासुरमर्दिनी अंतरिक्षस्वामिनी,
दत्तात्रेय माता तु गं परमकारुणिका,
तुच अनसूया पृथ्वीवृत्तीची स्वामिनी...१
तुच गं महिषासुरमर्दिनी अंतरिक्षस्वामिनी,
दत्तात्रेय माता तु गं परमकारुणिका,
तुच अनसूया पृथ्वीवृत्तीची स्वामिनी...१
लावण्य अन् सौंदर्य हे शब्द,
लाजून नाहिसे जणु आता होणार,
अशी ती वत्सल आदिमाता,
बैसली त्रैमूर्तीसह पारावर...२
लाजून नाहिसे जणु आता होणार,
अशी ती वत्सल आदिमाता,
बैसली त्रैमूर्तीसह पारावर...२
वदन तिचे शुभ्र प्रफुल्लित कमळाप्रमाणे,
तेजस्वी नेत्र ती दिव्य सूर्याप्रमाणे,
तरीही पुत्रांवर कृपादृष्टी साजिरी,
केशसंभार दाट तो पृथ्वी परिघाप्रमाणे...३
तेजस्वी नेत्र ती दिव्य सूर्याप्रमाणे,
तरीही पुत्रांवर कृपादृष्टी साजिरी,
केशसंभार दाट तो पृथ्वी परिघाप्रमाणे...३
तुझ्या शक्तीपुढे नमती सूर्य-वायू,
पर्जन्य देवताही न ओळखे तुजला,
वामदेव कास्याच्या अहंकाराचा बिमोड करण्या,
अवतरलीस तू रक्षिण्या ऋषी मृकंडाला...४
पर्जन्य देवताही न ओळखे तुजला,
वामदेव कास्याच्या अहंकाराचा बिमोड करण्या,
अवतरलीस तू रक्षिण्या ऋषी मृकंडाला...४
कलिने उदगारली अशुभ अस्त्रे तिजवरी,
तरी तिची तपश्चर्या न भंगली,
कलिपुरुषास धडा शिकवण्या मग,
दत्तगुरुस्मरण अखंड राखित ती उठली...५
तरी तिची तपश्चर्या न भंगली,
कलिपुरुषास धडा शिकवण्या मग,
दत्तगुरुस्मरण अखंड राखित ती उठली...५
दिला तिने चुकीबद्दल शाप कलिपुरुषास,
श्रीगुरु भक्तांच्या जाऊ नको वाटेस,
एका हाता-पायाने होशील तू अपंग,
श्रद्धावानांकरिता तू नेहमी राहशील असाच..६
श्रीगुरु भक्तांच्या जाऊ नको वाटेस,
एका हाता-पायाने होशील तू अपंग,
श्रद्धावानांकरिता तू नेहमी राहशील असाच..६
बोले माता अनसूया हळूवार,
मंत्रमालिनी हा नववा अवतार,
श्रवण अन् पठणकर्त्या भक्तांवर,
कृपाकर असे माझा वारंवार...७
मंत्रमालिनी हा नववा अवतार,
श्रवण अन् पठणकर्त्या भक्तांवर,
कृपाकर असे माझा वारंवार...७
साक्षात मी असेन मग तिथे,
पठण होईल भक्तिभावाने जिथे,
मंत्रमालिनी तू कलिमलहारिणी साचार,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८
पठण होईल भक्तिभावाने जिथे,
मंत्रमालिनी तू कलिमलहारिणी साचार,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८
Poem By : Pranilsinh Takale, Design By : Truptiveera Sonde
-----------------------------------------------------------------------------------------------------------------Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)
Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback