नन्दिनी..
द्वापारयुगाच्या उत्तरार्थात सोडून गुरुकुल,
ऋषीकुमार राहू लागले मग राजवाडयात,
ऋषीवर ही संज्ञा त्यांची त्यागून,
त्यांना कुलाचार्य म्हणत राजधान्यांत...१
ऋषीकुमार राहू लागले मग राजवाडयात,
ऋषीवर ही संज्ञा त्यांची त्यागून,
त्यांना कुलाचार्य म्हणत राजधान्यांत...१
कालांतराने धर्मग्लानी आलेली पाहून,
ऋषीजनांनी केली आराधना महाविष्णुची,
पुत्र होऊन जन्मणार देवकी-वसुदेवाचा,
कृपा प्राप्त झाली कृपाळू आदिमातेची...२
ऋषीजनांनी केली आराधना महाविष्णुची,
पुत्र होऊन जन्मणार देवकी-वसुदेवाचा,
कृपा प्राप्त झाली कृपाळू आदिमातेची...२
कंस राजा अन् जरासंघ दैत्यराज,
प्रबळ असे हे सम्राट होते माजलेले,
नवजात बालकाला नष्ट करण्याची,
अघोरी अशी ही विद्या प्राप्त झालेले...३
प्रबळ असे हे सम्राट होते माजलेले,
नवजात बालकाला नष्ट करण्याची,
अघोरी अशी ही विद्या प्राप्त झालेले...३
कृष्ण जन्मावेळी तुझे रक्षण करीन,
हे आदिमातेने दिले पुर्ण वचन,
त्यानुसार महाविष्णुने देवकीच्या पोटी,
घेतला जन्म करण्या तयांचे उद्धरण...४
हे आदिमातेने दिले पुर्ण वचन,
त्यानुसार महाविष्णुने देवकीच्या पोटी,
घेतला जन्म करण्या तयांचे उद्धरण...४
बलराम जन्मले त्याआधी रोहिणीस,
कृष्ण अवताराला सहाय्य करण्यास,
श्रावण वद्य अष्टमीला मग मध्यरात्री,
जन्मास आले मनोहर देवकीनंदन...५
कृष्ण अवताराला सहाय्य करण्यास,
श्रावण वद्य अष्टमीला मग मध्यरात्री,
जन्मास आले मनोहर देवकीनंदन...५
संपुर्ण मथुरानगरीला केले निद्राधीन,
सावळ्याच्या नजरेने पडल्या शृंखला गळून,
नंदगोपाच्या घरी रम्य-सुरेख गोपाळात,
सुखरुप घनःश्याम खेळे रास रचून...६
सावळ्याच्या नजरेने पडल्या शृंखला गळून,
नंदगोपाच्या घरी रम्य-सुरेख गोपाळात,
सुखरुप घनःश्याम खेळे रास रचून...६
पुत्राच्या अवतारकार्यासाठी तू प्रकटलीस,
सप्तम अवतार नन्दिनी हे नाम धारिलेस,
जरासंघ कन्येस मारण्या धावताक्षणी,
विजेच्या कडकडाटासह तू अवतरलीस...७
सप्तम अवतार नन्दिनी हे नाम धारिलेस,
जरासंघ कन्येस मारण्या धावताक्षणी,
विजेच्या कडकडाटासह तू अवतरलीस...७
कंस वध होणार निश्चित सांगितले,
त्यासाठी परमात्मस्वरुप कृष्ण जन्मले,
देवकी-वसुदेवास दिसे आदिमाता समोर,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८
त्यासाठी परमात्मस्वरुप कृष्ण जन्मले,
देवकी-वसुदेवास दिसे आदिमाता समोर,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८
Poem By : Pranilsinh Takale, Design By : Truptiveera Sonde
Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)
Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback