मोठ्या आईचा आठवा अवतार ‘दत्तमंगलचण्डिका’वर केलेली कविता (मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथावर आधारित)


दत्तमंगलचण्डिका...

कृष्ण हा परमात्मस्वरुप आठवा,
जन्मापासून असूरनाशासाठी धावला,
जीवनभर फक्त त्याच्या भक्तांसाठी,
अहर्ऩिश तो राधेश्याम कष्टला...१

रम्य गोकुळात नटखट त्या लीला,
कधी यमुना काठी वाजवी पावा,
मथुरेतही अगदी क्षणार्धात जाई,
जेव्हा गोप-गोपिका करती धावा...२

पांडवाच्या बाजूने उभा राहिला सक्षम,
कौरव जे श्रद्धाहीन नसती कोणाचे,
ही समस्त जगाला देऊन शिकवण,
धडे गिरविले अर्जुनाकरवी भगवतगीतेचे...३

आता तो अवतारकार्याची करण्या समाप्ती,
बैसला आदिमातेचे ध्यान करीत प्रभासक्षेत्री,
आदिमातेच्या आज्ञेने त्या तेथे मग,
श्रीगुरु अन् परशुराम प्रस्थान करिती...४
श्रीदत्तात्रेय ठेवती शिरी तयाच्या कृपाहस्त,
श्रीकृष्ण ध्यानयोगमग्न होता समाधिस्थ,
अचानक त्या क्षणी व्याधाचा एक बाण,
मृग अंग समजून शिरला वेगाने तळव्यात..५

परमात्मा असूनही कर्माचा अटळ सिद्धांत,
स्वीकारणे कृष्णाला होते ते बंधनकारक,
सातव्या अवतारात होता मानवीजन्म,
त्यावरुन हे कर्म स्वीकारणारा धर्मपालक..६

तत्क्षणी ती महन्मंगला तेथे अवतरून,
स्वपुत्राला स्वहस्ते मांडीवर बसवी,
अठराही हातांनी अमर्याद लाड करुन,
सतत झटलेल्या पुत्राचा श्रमपरिहार करवी..७

श्रीकृष्ण शांत मातेच्या बसून अंकावर,
त्रिपदा गायत्री मंत्र म्हणत वारंवार,
दत्तमंगलचण्डिका चरणी करुन नमस्कार,
नवरात्री करतो  आई आज तुझा जागर...८

Poem By : Pranilsinh Takale,     Design By : Truptiveera Sonde
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)

Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale

Comments

Post a Comment

Ambadnya for your precious feedback