मोठ्या आईचा सहावा अवतार ‘श्रीरामवरदायिनी’वर केलेली कविता (मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथावर आधारित)


श्रीरामवरदायिनी...

भगवान श्रीपरशुराम बसले तपश्चर्येस,
लंकापती रावणाने पळवले सीतेस,
दिवसेंदिवस वाढला रावणाचा प्रमाद,
आदिमाता सक्षम रक्षण्या पुत्री-पुत्रांस..१

महारुद्र स्वरुप जन्मले मग,
तात, दूत, सखा होऊनी दास,
श्रीराम-लक्ष्मणास करण्या मदत,
सिद्ध बहाबली त्याचा श्रीराम हा श्वास..२

अमृतकलशाचे स्थान नव्हते उमगत,
बिभीषणाला होता विस्मरणाचा शाप,
आदिमाता अशुभनाशिनी स्तवनातून मग,
हरले जात होते भवभय पाप-ताप...३

कपटाने श्रीराम-लक्ष्मणाचे हरण,
करण्या आला दुर्गम तेथे लपून,
हनुमंताने स्तवन करता चण्डिकेचे,
दुर्गमाचा नाश करण्या आली धावून..४

हळूहळू स्थान आठवले अमृतकलशाचे,
धरून वेध कार्य संपवले रावणवधाचे,
श्रीराम जिंकले माय चण्डिकेच्या कृपे,
बिभीषणा सोपिले राज्य रावणाचे...५

त्रिपुराम्बा प्रकटली सूर्यास्त होण्याआधी,
जणू तेजाने तिच्या रात्रीचा झाला दिवस,
श्रमपरिहाराकरिता मग पुत्रांना पाजिले तिने,
मधु श्रीराम-जानकी-लक्ष्मण अन् हनुमंतास..६

मायकृपे श्रीरामनाम तारक मंत्र बनले,
श्रीरामवरदायिनी-दुर्गा नामे मातेला गौरविले,
जानकीने केले तेव्हा मग अग्निदिव्य,
अयोध्येत रामराज्य पवित्र प्रस्थापित झाले...७

अशुभ नाशासाठी आलीस गं धावून सत्वर,
परमात्म्याला सतत भक्कम देण्या आधार,
श्रीरामवरदायिनी तुला प्रेमपुर्वक नमस्कार,
नवरात्री करतो आई आज तुझा जागर...८

Poem By : Pranilsinh Takale,     Design By : Truptiveera Sonde
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Aniruddha Kaladalan Group Project (Navaratri Utsav)

Group Members
Nikhilsinh Prabhawalkar
Sandeshsinh Shingre
Nageshsinh Shikre
Truptiveea Sonde
Pranilsinh Takale

Comments