आला हा अनिरुद्ध


दुष्ट दुर्जनांचा विनाश करण्या
श्रद्धावानांना आश्रय देण्या
माँ चंडीकेचे राज्य स्थापण्या
आला हा अनिरुद्ध ।।
धर्मचक्राची स्थापना झाली
अनिरुद्धगती पावित्र्यास मिळाली
अविरोधाचा मार्ग क्रमून
दिशा दर्शितो अनिरुद्ध ।।
सत्य-प्रेम-आनंदाच्या वाटेवर
अवघाचि संसार सुखाचा करण्यावर
महामेरु हा निश्चयाचा खंबीर
वसा घेतो हा अनिरुद्ध ।।
त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह हे देऊनि
अशुभाचा संपूर्ण नाश करुनि
पावित्र्य हेच प्रमाण हे तत्व
जगी स्थापतो हा अनिरुद्ध ।।

- प्रशांतसिंह तळपदे 
(Aniruddha Kaladalan)

Comments