तुझाच हात धरून ठरवितो आम्ही दिशा
करतो नवे संकल्प, पण तेही मोडत बसतो
पण तुझे मात्र तसे नाही
प्रत्येक वर्षी देतोस नवे काही खास, आम्हास
तुझ्या प्रेमाचा, तोच खरा बोनस
चंद्रानेही तेव्हा हट्टच केला असणार
माझ्या अखंडतेतच "तो" जन्मणार
टिपूर चांदण्यांस हर्ष झाला
त्रिपुरारी हरी धरणीवर अवतरला
त्रिपुरारी पौर्णिमा "तुझा" जन्मदिवस
तुझ्या प्रेमाचा, तोच खरा बोनस
कष्टातोस अनेक वेळा, तिष्टतोस वेळो वेळा
वेळ नाही, वेळ नाही म्हणून आम्ही
करतो सारी सारावा सारव
थकलो असेन म्हणून मी
मायेने मजलागी कवटाळतोस
तुझ्या प्रेमाचा, तोच खरा बोनस
वादाच्या पलीकडचा संवाद शिकविलास
मधुर शब्दांनी पुन:र्जन्म केलास
त्याच मायेच्या झऱ्यातून
मोठ्या आईशी संवाद साधलास
असं कुठे झालं असतं का?
शक्यच नाही हेच खोडून टाकलस
तुझ्या प्रेमाचा, तोच खरा बोनस
बोनस घेतला, बोनस घेतला भरभरून
अनिरुद्ध पौर्णिमेच्या दिवाळी दिवशी मात्र
झोळी गेली फाटून
त्या पवित्र दिनी तुझ्या समोर येवून
पुन्हा झालो याचकच
का नाही विचार केला तेव्हा?
हा तुझा वाढदिवसच
माफ कर देवा असं नाही होणार पुनः
यंदा मी साठवलाय सारा बोनस
येईन फक्तं तुझाच होवून
लाभो फक्तं तुझाच सहवास
मोठी आई बापूंना दे भरभरून सुखांचा पाझर, हिच एक ईच्छा
वाढदिवस आमच्या बाबांचा, आम्ही त्यांची बाळे देतो अंबज्ञ शुभेच्छा!!!!
- अंबज्ञ संतोषसिंह कृष्णा राणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback